Mahatma jyotiba phule information | Mahatma Phule born | Education of Mahatma Jotiba Phule | Social Reforms |Work on Women’s Education | Work for farmers
एकोणिसाव्या शतकात अस्पृश्यता निर्मूलनाची आंदोलनाची पायाभरणी महात्मा फुले यांनी केली. या मुक्तिसंग्रामाचे मूळ स्रोत ज्योतिरावांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातच आढळतात.महात्मा जोतीराव फुले यांनी अमर्यादित अशी समाजसेवा केली.स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंधकगृह ,अस्पृश्यविरुद्ध कार्य , शेतकऱ्यांसाठी कार्य समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी त्यांनी अमूल्य कार्य केले लक्ष्मणशास्त्री जोशी, महात्मा फुले यांचा गौरव करताना म्हणतात.हिंदू समाजातील बहुजन समाजात.आत्मप्रत्यय व आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. Mahatma Jyotirao Phule In Marathi
महात्मा जोतिबा फुलेंचे बालपण आणि शिक्षण | Childhood and education of Mahatma Jyotiba Phule
Where was Mahatma Phule born?
जोतिबा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील लहानशा गावात कटगुण येथे ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. ज्योतिबांचे पूर्वज हे फुलेंचा व्यवसाय करत.त्यामुळे फुले त्यांचे आडनाव झाले. जोतिबांचे पिताचे नाव गोविंदराव व माताचे नाव चिमणबाई होते.त्यांचे बालपण मात्र सुखासमाधानात नव्हते, कारण नऊ महिन्यांचे असतानाच त्यांनी आपल्या आईला गमावले. आईच्या मायेपासून वंचित जोतिबांचा सांभाळ त्यांच्या वडिलांनी केला. जीवनाच्या या सुरूवातीपासूनच जोतिबा एका कणखर मनोवृत्तीने पुढे वाढत गेले.
बाराव्या वर्षीच जोतिबा विवाहबंधनात अडकले. सावित्रीबाई, जी त्यांची जीवनसाथी बनली, त्यांच्या आयुष्याची वाटचाल पुढे जोतिबासोबतच समाजसेवेच्या दिशेने घेऊन गेली. जोतिबांचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील पंतोजींच्या शाळेत मराठीतून झाले, जिथे त्यांनी ज्ञानाचे बीज रुजवले. पण गरिबीमुळे शिक्षण पूर्ण करणे कठीण होते, म्हणून काही काळ त्यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी भाजी विक्रीचा व्यवसायही केला.
परिस्थितीवर मात करत, वयाच्या चौदाव्या वर्षी १८४२ साली जोतिबा यांनी स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. इथल्या इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना त्यांनी नव्या जगाचा परिचय करून घेतला. अभ्यासात ते इतके हुशार होते की पाच-सहा वर्षांतच त्यांनी आपला शिक्षणक्रम पूर्ण केला. शाळेत असतानाच त्यांनी इंग्रजी, मराठी, उर्दू, कन्नड, तामिळ, आणि गुजराती अशा अनेक भाषा शिकून घेतल्या, ज्यामुळे त्यांचे ज्ञानक्षेत्र अधिकाधिक विस्तारित झाले.
जोतिबा यांचे बहुभाषिक ज्ञान आणि त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेमुळे त्यांना समाजातील समस्या समजून घेता आल्या. या विविध भाषांच्या साहाय्याने त्यांनी समाजातील अन्यायकारक प्रथा, विषमता, आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपल्या विचारांना शस्त्र बनवले. सावित्रीबाईंच्या सोबतीने जोतिबा फुलेंनी समाज सुधारण्याचे अनेक कार्य यशस्वीपणे पार पाडले, ज्यामुळे ते हजारो लोकांसाठी प्रेरणास्थान ठरले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली, ज्यातून अन्यायाच्या चक्रातून मुक्त होण्याची नवी वाट सापडली.
महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक सुधारणा | Social Reforms of Mahatma Jotiba Phule
1. स्त्री शिक्षणा बद्दल कार्य | Work on Women’s Education
जोतीबांनी समाजकार्य सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले 1948 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेंच्या वाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. तसेच 3 जुलै 1851 रोजी बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळाही जोतीबांनी सुरू केली.
17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठ येथे मुलींची तिसरी शाळा सुरू केली व 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेतील मुलींची आणखी एक शाळा सुरू करण्यात आली. फुले यांचा स्त्री शिक्षणात खूप मोठा वाटा आहे.तसेच त्यांनी विधवा पुनर्विवाह साठी ही खूप कार्य केले. स्त्री शिक्षणाविषयी महत्व सांगताना जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी.असे फुले म्हणत.
2. विधवा पुनर्विवाह बद्दल कार्य | Works about widow remarriage
1864 साली पुण्यातील गोखले यांच्या बागेत फुलेंनी पहिला पुनर्विवाह घडून आणला. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ज्योतीबांनी १863 साली केली. चुकून वाकडे पाऊल पडलेला विधवांच्या आपत्तीतून सुटका करण्यासाठी ज्योतिबाने स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.जोतीबांना आपत्य नव्हते काशीबाई या विधवेच्या यशवंत या मुलाला त्यांनी दत्तक घेतले.
3. अस्पृश्यांसाठी कार्य
- 1851 साली अस्पृश्यांच्या मुलांसाठी नाना पेठेत त्यांनी पहिली शाळा सुरू केली नंतर मात्र बंद पडली.
- 1852 साली अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरू केली.
- 1853 साली महार मांग इत्यादि लोकासाठी विद्या शीकवणारी मंडळी या नावाची संस्था पुणे स्थापन केली
- 1858 साली अस्पृश्यांसाठी तिसरी शाळा सुरु केली. फुले यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राइज फंडातून आर्थिक सहाय मिळाले.
- 1868 साली स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.१873 साली महात्मा फुले यांनी अस्पृशता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
- आठ वर्षाच्या आतील मुलांना कामावर घेण्यात येऊ नये असे निवेदन जोतीबांनी सरकारला सादर केले होते .
4. महात्मा फुल्यांची शेतकऱ्यांसाठी कार्य. | Work for farmers by Mahatma Phule.
शेतकऱ्यांच्या स्थिती सुधारणेविषयीं ज्योतिबानी सरकारला पुढील सूचना केल्या होत्या. तलाव बंधारे धरणे बांधून शेतीला योग्य पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा.पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने मिळावेत.कालव्याचे पाणी वेळेवर मिळावे पशुपालनासाठी चालना द्यावी. सुधारित शेतीसाठी सुधारित अवजारे अल्पव्याजी कर्ज शेतकरणी उपलब्ध करून द्यावी.
1877 च्या दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी जोतिबांनी कॅम्प उभारला होता. १८८८ मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट भारताच्या भेटीवर आले असता जोतिरावांनी पारंपरिक शेतकरी वेशात त्यांची पुणे येथे भेट घेऊन भारतीय शेतकऱ्यांच्या हलाखीचे दर्शन घडविले.शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथात शिक्षणाअभावी समाजाची कशी परवड होते हे त्यांनी प्रखरपणे मांडले होते.
5. ज्योतिबांचे शिक्षण विषयक विचार | Jyotiba’s thoughts on education
१८८२ साली भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन नेमण्यांत आले होते.ज्योतिबांनी हंटर कमिशनसमोर साक्ष देताना पुढील विचार मांडले. सरकार शेतकऱ्याकडून जो सारा वसूल करते. त्यातील उत्पन्न शेतकरी वर्गाच्या शिक्षणावर खर्च केला पाहिजे.
12 वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे. प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील प्रशिक्षित असावा.
6. जोतिबांचे धर्मविषयक विचार
ज्योतिबा कट्टर एकेश्वरवादी होते व ईश्वराचे अस्तित्व मानणारे होते. ज्योतिबानी ईश्वराला निर्मिक असे संबोधले आहे.समतेवर आधारलेल्या मानवधर्माचा ज्योतिबांनी पुरस्कार केला.
7. महात्मा फुले यांचे राजकीय विचार
- इंग्रजांच्या सामाजिक, शैक्षणिक सुधारणा धोरणामुळे जोतीबांना त्यांच्याबद्दल सहानुभूती.होती मात्र शासनसत्ता समाजाच्या उन्नतीच्या विशेषता शेतकर्याच्या हितसंबंधांच्या आड येईल असे वाटत त्या त्या वेळी त्यांनी सरकारवर टीका देखील केली.मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या जोतिबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार या बाईंनी मुलींसाठी सुरू केल्याची प्रेरणा होती.
- 1852 साली ज्योतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे मेजर कँडीच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.
- 1865 मध्ये विधवांच्या केशव पणबंदीसाठी प्रयत्न करताना तळेगाव ढमढेरे येथे नाव्ह्यांचे संप यांनी घडवून आणला.
- डिसेंबर 1873 मध्ये.सीताराम आल्हाटवर आणि राधाबाई निंबकर या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावला.
- 18७५ साली न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतीची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यामुळे ज्योतिबांनी न्यायमूर्ती रानडे यांना सहकार्य केले.
- रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी, असा अर्ज जोतीबांनी केला होता.जुन्नर पुणे येथील शेतकर् यांच्या सावकारशाही विरुद्ध असा लढा जोतीबांनी यशस्वी केला होता.1877 च्या दुष्काळा धनकवडी येथे विक्टोरिया बालकाश्रमाची.स्थापना केली.
8. महात्मा ज्योतिबा फुले यांचे राजकीय जीवन–
1876 ते 1882.या काळात फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. नगरसेवक असताना फुलेंनी पुणे मार्केटची इमारत बांधण्यास लॉर्ड रिपनला मानपत्र देण्यास विरोध दर्शवला व त्यावरील खर्च शिक्षणासाठी वापरावा अशी शिफारस केली.1870 दिनबंधु हे वृत्तपत्र ज्योतिबाच्या आशीर्वादाने चालू झाले.
9. इतर माहिती
- 11 मे 1888 मुंबईच्या जनतेच्या वतीने रावबहादुर वडेकर यांनी जोतिबांना महात्मा ही पदवी दिली.
- इतर माहिती सार्वजनिक सत्यधर्म.हां ज्योतिबाचा शेवटचा धर्मग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला.पक्षघातामुळे अंग लुळे पडल्याने जोतीबांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ काही काळ डाव्या हाताने लिहला काही समाज कंटकांनी जोतिबांना जे मारण्यासाठी पाठविलेले रोडे व कुंभार हे रामोशी जोतीबांना शरण आले.
- जोतिबांच्या कार्यात त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांनी त्यांना सावलीप्रमाणे साथ दिली.सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या.1876 ते 77 च्या दुष्काळात पुणे व अहमदनगर जिल्ह्यात ज्योतिबाच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी खतफोडीचे बंड यशस्वी केले .टिळक व आगरकर यांची डोंगरी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर महात्मा फुलेंनी या दोघांचा मुंबई येथे सत्कार केला.
- ज्योतिबांवर थॉमस पेन यांच्या राइट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा विशेष प्रभाव होता.जोतिबा.शालेय जीवनात जोतिबावर छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा प्रभाव पडला होता.
- 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.जोतिबांचे निधन 28 नोव्हेंबर 1890. मध्ये झाले ज्योतिबांनी मृत्युपत्रात आपले दहन न करता परसदारी मिठात घालून पुरण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली होती.मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही.
10. ज्योतिबा बद्दलचे गौरवोद्गार | Praise for Jyotiba
- महात्मा जोतिबा फुले हे खरे लोकशिक्षणाचे शिल्पकार होता .
- जोतिबा फुले या माळ्याने बागेतील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारे बांडगुळी उपटून तेथे फुलझाडांची उत्तम जोपासना केली.महात्मा गांधी फुलेविषयी म्हणतात ज्योतिबा हे खरे महात्मा होते.
- बडोदा अधिपती सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदुस्तानचा बुकर वॉशिंग्टन असे संबोधले आहे.ज्योतिबाला महाराष्ट्राचे मार्टिन लूथर म्हणून ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला.हू वेअर द शूद्राज शूद्र कोण होते? हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित करून त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.ज्योतिबा हे युक्ती आणि कृती यामध्ये.एकवाक्यता साधणारे सुधारक होती.
- ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी सत्तार या ग्रंथामधून जोतीबांनी बहुजन समाजावर लादली गेलेली मानसिक गुलामगिरी निदर्शनास आणली.स्त्री पुरुष समानता जातिभेदास, विरोध स्वातंत्र्य, समता व बंधूता यांचे महत्त्व पटवून मानवाची.स्वस्त जगणारे ज्योतिबा हे भारतीय समाजक्रांतीचे जनक होती. jyotiba phule information in marathi
11. जोतिबा यांचे साहित्य संपादन | Editing of Jotiba’s material
साहित्य | वर्ष | ग्रंथातून प्रकाश टाकलेल्या बाबी |
तृतीय रत्न | 1855 | पुरोहितांकडून शुद्रांची केली जाणारी फसवणूक |
छ. शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा ‘कुळवाडी’ | 1869 | भूषण’ या नावे लिहिलेल्या या पोवाड्यात शिवचरित्र स्पष्ट केले आहे. |
ब्राह्मणांचे कसब | 1869 | संधीसाधू ब्राह्मणांच्या कारवायांवर प्रकाश |
गुलामगिरी | 1873 | ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीपासून ते भटपांड्यांच्या बंडापर्यंतचा समग्र इतिहास यात स्पष्ट केला आहे. हा ग्रंथ गुलामांना दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेस समर्पित. |
शेतकऱ्यांचा आसूड | 1883 | शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन. |
सत्सार | 1885 | सामाजिक प्रश्नांचा उहापोह |
इशारा | 1885 | जातिभेदाविषयी विचार |
सार्वजनिक सत्य धर्म | 1891 | निर्मिकाची (ईश्वराची) संकल्पना मांडली धार्मिक, सामाजिक, नैतिक इ. विविध विषयांवर चर्चा |
महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म कधी आणि कोठे झाला?
महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला.
महात्मा फुले यांनी कोणत्या सामाजिक सुधारणा केल्या?
महात्मा फुले यांनी समाजातील जातीव्यवस्था, स्त्री-शिक्षणाचा अभाव, विधवा पुनर्विवाह, आणि शूद्र-अतिशूद्रांच्या अधिकारांचा अभाव यांसारख्या समस्यांवर काम केले. त्यांनी स्त्री-शिक्षणाला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुलेंना शाळेत शिकवले आणि पुण्यातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.
महात्मा फुले यांचे शिक्षण कसे झाले?
फुलेंचे प्राथमिक शिक्षण मराठीतून पुण्यातील पंतोजींच्या शाळेत झाले. नंतर १८४२ साली त्यांनी स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले, जिथे त्यांनी पाच-सहा वर्षांतच अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षणामुळे त्यांना विविध भाषांचे ज्ञान मिळाले.
महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथांचे लेखन केले?
महात्मा फुले यांनी अनेक ग्रंथ लिहिले, ज्यात “गुलामगिरी,” “शेतकऱ्याचा आसूड,” आणि “तृतीय रत्न” या महत्त्वाच्या ग्रंथांचा समावेश आहे. त्यांच्या ग्रंथांनी समाजातील विषमता आणि अन्यायावर प्रकाश टाकला.
महात्मा फुले यांची पत्नी कोण होती आणि त्यांची काय भूमिका होती?
महात्मा फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले होती. त्यांनी आपल्या पतीसोबत शिक्षण आणि समाजसुधारणा कार्यात मोलाची भूमिका बजावली. त्या भारतातील पहिल्या शिक्षिका ठरल्या आणि त्यांनी स्त्री-शिक्षणासाठी मोठे योगदान दिले.
Read More
1.सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती | Savitribai Phule Information in Marathi
2.डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती | dr babasaheb ambedkar information in marathi