स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती | Veer Savarkar Information in Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती | Veer Savarkar Information in Marathi | बालपण | शिक्षण | इंग्रजा विरुद्धचा लढा | लंडन ते कालापानी सजा | Controversy

असा एक स्वातंत्र्यवीर जो नेहमीच चर्चेत असतो काही सत्ताधारी पक्ष त्यांना आपला आदर्श मानतात तर त्या उलट काही पक्ष हे त्यांना स्वातंत्र्यवीर गांधी, नेहरू आणि पटेलजी यांच्याशी गद्दारी करणारे आणि त्यांचा तिरस्कार करणारा मानतात. व्ही डी सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर हे नाव आपण नेहमीच टीव्ही आणि न्यूज चैनल च्या माध्यमातून आज ऐकत आहोत. विनायक दामोदर सावरकर हे नाव सर्वात जास्त वादग्रस्त क्रांतिकारक यामध्ये आपण बघू शकतो

Veer Savarkar Information in Marathi चला तर मित्रांनो जाणून घेऊया अशा एका क्रांतीकारा विषयी ज्याने आपलं पूर्ण आयुष्य हे देश सेवेसाठी लावले आहे त्यांचे बालपण त्यांची भारत स्वातंत्र्य होण्यासाठीची भूमिका त्यांची कामे त्यांची आंदोलने आणि त्यांचे किंवा त्यांच्यावर लावले गेलेले वादग्रस्त आरोप याविषयी आणि तुम्हीच ठरवा हा क्रांतिकार नायक होता की खलनायक होता.

वीर सावरकरांचे बालपण | Childhood of Veer Savarkar

स्वतंत्रसैनिक,कवी,समाज सुधारक लेखक या नावाने ओळखले जाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यापासून अवघ्या 17 किलोमीटर असलेल्या भगूर गावात झाला. त्यांचे वडील दामोदर पंत सावरकर यांना तीन मुलं होती थोरले बाबाराव, मधले म्हणजे दुसरे सावरकर आणि नारायणराव अशी तीन मुले होती. सावरकरांची आई ते नऊ वर्षाच्या असतानाच त्यांना देवाज्ञा झाली त्यांचे थोरले बंधू बाबाराव यांच्या पत्नी येसू वहिनी यांनी त्या दोघा भावांचा सांभाळ केला सावरकरांचे वडील इसवी सन 1899 ला प्लेग रोगाचे बळी पडले सावरकरांचे प्राथमिक शिक्षण हे नाशिक जिल्ह्याच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले.

चाफेकर बंधूंचा चा प्रभाव आणि वीर सावरकरांच्या प्रतिज्ञा

1897 साली ज्यावेळेस प्लेगची साथ पुण्यात आली होती, त्यावेळेस इंग्रज सरकारांनी लोकांवर खूप अत्याचार केले होते, नुकतंच येऊन गेलेला एक मूवी ज्या मध्ये रणदीप हुडा याने सावरकर यांची भूमिका साकारली होती आणि जीवनावर आधारित आहे, त्यामध्ये दाखवण्यात आले आहे की ज्या वेळेस प्लेगची साथ ही आली होती त्यावेळेस इंग्रजांनी घरोघरी जाऊन लोकांची तपासणी केली आणि प्लेग ची साथ असलेल्या लोकांना अक्षरश ठार मारण्यात आले होते तर काही लोकांना जिवंत जाळण्यातही आले होते असे या मूवीत आपल्याला बघायला मिळतं, हे सत्य आहे का हे सांगणं थोडं अवघड आहे परंतु हे नक्कीच की त्या प्लेगच्या साथीमुळे इंग्रजांनी लोकांवरती खूप अत्याचार केले होते आणि याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी प्लेगच्या साथीवर तपासासाठी जे पुण्याचे कमिशनर रँड हे देखरेख करत होते यांचा चाफेकर बंधूंनी खून केला होता आणि यासंदर्भात सरकारला माहिती देणारे गणेश आणि रामचंद्र द्रविड ह्यांनाही ठार मारले. आणि त्यामुळे चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली होती त्यांच्या बलिदानचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला होता कारण की त्यांचे वडीलही हे प्लेगच्या साथीचे बळी पडले होते आणि त्या मुळे त्यांनी आपल्या कुलदैवत भगवती समोर शपत घेतली होती की “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरतो झुंजेन” अशी शपथ घेतली होती.

अभिनव भारत संघटनेची स्थापना | Establishment of Abhinav Bharat Association

सावरकर हे दूरदृष्टी असलेले क्रांतिकारक आपल्या भू मातेला लाभले होते, उदाहरण द्यायचेच म्हटले तर ते सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी “राष्ट्रभक्त समूह” हे गुप्त मंडळ याची स्थापन त्यांनी केली होते,

इंग्रजांना त्रस्त झालेले तरुण पोरांना एक वटून त्यांना राष्ट्रभक्तीच्या मार्गाला लावणे व आपल्या या राष्ट्रभक्त समूहात सामील करून घेणे हे कार्य सावरकरांनी आपल्या हाती घेतलेले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रभक्त समूहाचा बऱ्याच संघटना उभ्या केल्या आणि त्या पलीकडे जर एखादी प्रकट चळवळ आपल्याला घडून आणायचे असेल तर त्यासाठी त्यांनी जानेवारी 1900 मध्ये “मित्र मेळ्या समूहाची” स्थापना केली कालांतराने 1904 मध्ये मित्र मेळ्या या संघटनेचे रूपांतरण “अभिनव भारत” या संस्थेत झाले. स्वतंत्रवीर सावरकर हे सशस्त्र क्रांतिकारक यामुळे हे ओळखले जातात की त्यांनी अशा संघटना उभ्या केल्या कि ज्याची भनक तर इंग्रजांना होती पण त्या मागे कोण होते हि समजायला बराच काळ गेला. लोकांना प्रोत्साहन द्यायचं आणि जे क्रांतिकारक आहेत त्यांना सैन्या मध्ये भरती करून, एक चुपे युद्ध सावरकरांनी इंग्रजांविरुद्ध छेडले होते.

सावरकर हे गनिमी कावा करून शत्रूवर मात कशी करायची या मताचे होते आणि हाच मार्ग त्यांनी निवडला होता. सावरकर हे जोसेफ मॅझिनी या इटालियन देशभक्ताच्या आदर्श ठेवून होते त्याचप्रमाणे त्यांना आयलँड आणि रशियातील क्रांतीकारांचाही आकर्षण होते.

सावरकरांचा फर्ग्युसन कॉलेजचे लंडन प्रवास

लोकसत्ता या न्यूज चॅनलच्या सावरकरांविषयीच्या कार्यक्रमात सावरकरांच्या जीवनावर अभ्यास करणारे अक्षय जोग सांगतात की जेव्हा सावरकर नाशिक मधून स्थलांतरित होऊन हे पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये पदवीधर शिक्षण घेण्यासाठी आले होते ते फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये 17 नंबरच्या खोलीमध्ये राहत होते 1902 ते 1905 या काळात ते या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होते सावरकरांचा प्रभाव इतका होता की लोकमान्य टिळक आणि शी म परांजपे जे एक प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार होते यांची मुलं हे सावरकरांच्या सोबत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती | Veer Savarkar Information in Marathi

सावरकर यांचा प्रभाव असा होता की ते ज्या खोलीमध्ये राहत होते त्या खोलीचे वि.म भट हे अभिनव भारत च्या कार्यात त्यांची मदत करत होते आणि वि.म भट यांनी अभिनव भारत यांच्यावर पुस्तक लिहलं आहे. या कार्यक्रमात पुढे अक्षय जोग हे सांगतात की सावरकर हे त्यांच्या तब्येतीची काळजी घेत असत सतत व्यायाम करणे आणि बाहेर पडून आजूबाजूच्या डोंगरांवरती चढ-उतार करणे हे त्यांचे नित्यनियम होते.

ज्यावेळेस सावरकर हे सिंहगडावरती गेले असताना आपले मित्रासोबत गेले असताना त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुतळा बघितला त्यांना वंदन केल आणि आपल्या खोलीवरती आल्यानंतर त्यांना असं सुचलं की यांच्याविषयी आपण काहीतरी काव्य केलं पाहिजे, सावरकर हे नाशिकमध्ये मध्ये असताना काव्य करतच होते तर त्यांनी “सिंहगडाचा पोवाडा”, “बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा” आणि प्रसिद्ध काव्य “जयोस्तुते” ही लिहिली ज्यावेळेस पुण्यामध्ये प्लेगची साथ होती त्यावेळेस अधिक तर पुरुषांचा बळी या साथीने घेतला होता तर ज्या महिला विधवा झाल्या होत्या त्यांच्या भावना काय असतील हे व्यक्त करण्यासाठी सावरकरांनी त्यांच्यावर काव्य लिहिल होत आणि त्यावर त्यांना कॉलेजमध्ये पुरस्कृतही करण्यात आले होते.

Read More

  1. महात्मा गांधी माहिती मराठीत Mahatma Gandhi Information In Marathi
  2. महात्मा ज्योतिबा फुले यांची मराठीत माहिती | Mahatma Jyotiba Phule Information In Marathi

Leave a Comment