नीरज चोप्रा यांची संपूर्ण माहिती | Neeraj Chopra Information In Marathi

Neeraj Chopra Information In Marathi | Olympics GOLD MEDALIST Neeraj Chopra story | Early Life of Neeraj Chopra | Neeraj Chopra Family and Life | When did Neeraj Chopra start javelin? | Neeraj Chopra: List of Gold Medals Won | Neeraj Chopra Paris Olympic

नीरज चोप्राचे शिक्षण, नीरज चोप्राने भालाफेक कधी सुरू केली?, भारताचा यंग आयकॉन का ओळखता , भारताचा सर्वश्रेष्ठ खेडाळुमध्ये गणला जाणारा खेडाळु नीरज चोप्रा याचा जीवनपरिचय.नीरज चोप्रा या स्टार ऍथलीटचे आज आपण थोडक्यात जीवन चरित्र  बघणार आहोत. जे  कि तुम्हाला आम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे.  

नीरज चोप्रा यांचे प्रारंभिक जीवन | Early Life of Neeraj Chopra

नीरज चोप्रा या नावाला प्रत्येक भारतीय आता ओळखत आहे कारण त्याने भालाफेक याच्यात अचंबित करणाऱ्या कामगिरीमुळे. नीरज चोप्रा हा अतिशय शांत प्रिय मायाळू एक भालाफेक पटू आहे परंतु त्याच्या फील्डमध्ये खूप अग्रेसिव्ह आहे. आज प्रत्येक भालाफेक पटू आणि इतर मैदानी खेळ खेळणारे खेळाडूंच्या समोर नीरज चोप्रा हा एक आदर्श आहे, नीरज चोप्राचा प्रवास खरोखरच, एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या खेळाडूला प्रोत्साहन देणारे आहे. चला तर मग जाणून घेऊया नीरज चोप्राच्या लहानपणापासून ते एक नामांकित भालाफेक पटू परंत च्या प्रवासाबद्दल (Neeraj Chopra Information In Marathi, Neeraj Chopra Biography)

“नीरज” नावाचा अर्थ । Meaning of Neeraj

नीरज नावाचा असा अर्थ होतो कि , कमळाचे फूल तसेच कमलासारखे चमकणारे.  नीरज नावाच्या अर्थानुसार, नीरज नावाच्या  व्यक्ती शुद्धता, तेज आणि स्वच्छतेचे प्रतीक आहेत. पवित्र वेदांमध्येही ह्या नावाला  कमळाच्या फुलासारखे शुद्धतेचे प्रतीक मानले गेले आहे.

उदाहरणार्थ:

  1. नीरज हा एक सुंदर आणि पवित्र फुल आहे, ज्याचे पाणी असलेल्या जागी जन्म होते.
  2. नीरज चोपड़ा यांच्या नावाचा अर्थ “कमळ” आहे, जो पाण्यातून जन्म घेतो.
  3. कमळाचे फुल तलावात फुलते, त्याचप्रमाणे नीरज हा नावाचा अर्थही तलावात फुललेल्या फुलाशी संबंधित आहे.

नीरज चोप्राचे कुटुंब आणि बालपण | Neeraj Chopra Family and Life

नीरज चोप्राचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी  हरियाणातील खंद्रा येथे झाला. तो एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्याला त्याच्या गावातील ज्येष्ठ भालाफेकपटूकडूनच  या खेळाची ओळख आणि प्रेरणा मिळाली. त्यांचे वडील सतीश कुमार हे एक सामान्य शेतकरी आहेत, तर आई सरोज देवी गृहिणी आहेत. ते तीन भावंडं आहेत. तीन भावंडांमध्ये नीरज हा सर्वात मोठा आहे. त्याला संगीता आणि सरिता नावाच्या दोन लहान बहिणी आहेत. नीरजच्या कुटुंबात 18 हून अधिक सदस्य आहेत. त्याचा कुटुंबाचा पाठिंबा त्याच्या यशात महत्त्वाचा ठरतो.  एक साधारण खेडयातील कुटुंब असूनही ते त्याच्या संपूर्ण प्रवासात त्याच्या पाठीशी उभे राहिले. नीरज चोप्राचे यश केवळ त्याची वैयक्तिक नसून तर त्यांच्या कुटुंबाची सामूहिक शक्ती देखील दाखवते. (Neeraj Chopra Information In Marathi)

पूर्ण नाव / Nameनीरज चोप्रा
जन्म तारीख / स्थान
Birth date / Place
24 दिसम्बर 1997 पानीपत, हरियाणा, भारत
माता / Father nameसरोज देवी
पिता / Mother Nameसतीश कुमार
खेल / Sportट्रैक और फील्ड
प्रतिस्पर्धाभाला फेंक
कोच –प्रशिक्षक / Coachउवे होन
Neeraj Chopra Information In Marathi
Childhood photo of Neeraj Chopra

नीरज चोप्राचे शिक्षण | Neeraj Chopra Education

नीरज चोप्रा यांचे शालेय शिक्षण हरियाणा राज्यातील पानीपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील स्थानिक शाळेत झाले. त्यांच्या शालेय शिक्षणाच्या काळात ते विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेत होते. शाळेत त्यांनी धावणे आणि इतर खेळांमध्ये उत्तम कामगिरी केली होती. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेमुळे त्यांना शाळेतील शिक्षक आणि मित्रमंडळींकडून खूप पाठिंबा मिळाला. शालेय शिक्षणानंतर नीरज चोपड़ा यांनी चंडीगड येथील दयानंद अँग्लो-वैदिक (DAV) कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी कला शाखेतून शिक्षण घेतले. त्याचबरोबर त्यांनी क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षणाला देखील अधिक महत्त्व दिले. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील यशामुळे त्यांना महाविद्यालयात विविध क्रीडा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. नीरज चोपड़ा यांनी त्यांच्या क्रीडा शिक्षणासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) येथील पंचकुला येथील ताऊ देवी लाल स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेतले. तिथे त्यांनी त्यांच्या प्रशिक्षक जयवीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जॅव्हलिन थ्रोचे तंत्रज्ञान आणि तंत्रांची सखोल माहिती मिळविली. त्यांच्या मेहनतीने आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले. नीरज चोपड़ा यांनी त्यांच्या शिक्षणाच्या आणि क्रीडा क्षेत्रातील यशामुळे खूप प्रसिद्धी मिळविली आहे. त्यांच्या क्रीडा कौशल्याने आणि शिक्षणाने त्यांना विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळविण्यासाठी सक्षम बनविले आहे.

नीरज चोप्राने भालाफेक कधी सुरू केली? | When did Neeraj Chopra start javelin?

ज्या वेळेस नीरज चोप्रा ऑलम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकले त्यावेळेस बऱ्याच पत्रकाराने त्यांच्या फॅमिली मेंबरशी त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस असं कळलं की ज्यावेळेस नीरज चोप्रा हे लहान होते 12-13 शेवट वर्षाचे होते, त्यावेळेस ते खूप लठ्ठ होते. जवळजवळ त्यांचं वजन हे 80 किलोच्या आसपास होतं त्यावेळेस त्यांच्या कुटुंबीयांनी असा निर्णय घेतला की त्यांचं हे वजन कमी करण्यासाठी त्यांना पानिपतच्या एका जिम मध्ये ट्रेनिंग साठी पाठवायचं. त्यावेळेस नीरज चोप्रांची घरची परिस्थिती खूप बिकटची होती. परंतु त्यांचे काका हे पानिपत मध्ये काम करत असत आणि नीरज चोप्रा ही पानिपतला त्यांचं वजन कमी करण्यासाठी जिम मध्ये जात होते. त्याच वेळेस नीरज चोप्रा हे जवळ असलेल्या पानिपतच्या शिवाजी स्टेडियम मध्ये आपला काही वेळ घालत असे त्याच वेळेस त्यांना या खेळाची ओळख झाली आणि हा खेळ त्यांनी पहिल्यांदा पहिला.

रणवीर अल्लाबदिया (Ranveer Allahbadia) च्या टी आर एस हिंदी (The Ranveer Show हिंदी) च्या शोमध्ये नीरज चोप्रा सांगतो की तो कसा जावेलीन (Javelin)/भालाफेक खेळा कडे आकर्षित झाला. पुढे म्हणतो की ज्यावेळेस तो पानिपत मध्ये शिवाजी स्टेडियम मध्ये होता त्यावेळेस बरेचसे स्पोर्ट्स तिथे खेळले जात होते कोणी टेनिस खेळत होतं, कोणी बॅटमॅन खेळत होतं. तर त्यावेळेस एक कोपऱ्यात त्याचे मित्र जे की नवीनच त्या स्पोर्ट कडे वळले होते, तो म्हणजे जावेलीन (Javelin)/भालाफेक तर त्याला स्पोर्ट्स खूप आकर्षित वाटला आणि तो त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यासारखा एक जावेलीन (Javelin)/भालाफेक थ्रो त्याने त्यावेळेस केला तर तो उत्तम जावेलीन (Javelin)/भालाफेक करत होता. त्यावेळेस त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं की तू ज्या जावेलीन (Javelin)/भालाफेक ची ट्रेनिंग घे आणि तो आणि त्याचे मित्रांनी जावेलीन (Javelin)/भालाफेक ची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आणि त्यावेळेस त्याला मनापासून असं वाटलं की हा एक खेळ आहे ज्या मध्ये तो पुढे जाऊ शकतो शकतो आणि हाच मला करायचा आहे.

नीरज चोप्रा प्रशिक्षक | Neeraj Chopra Coach

त्याच्या भालाफेक कौशल्याने जयवीर चौधरीचे लक्ष वेधून घेतले, जो त्याचा पहिला प्रशिक्षक झाला. कोणतेही प्रशिक्षण न घेताही 40 मीटर थ्रो गाठण्याची नीरजची क्षमता जयवीर चौधरीने ओळखली. जयवीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, नीरजने जालंधरमधील भालाफेकीचे  प्रशिक्षण घेतले. तसेच पुढे नीरजला चोप्राला  दोन प्रभावी प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.

  1. Uwe Hohn (2018–2021): भालाफेकीत माजी विश्वविक्रम धारक, Hohn यांनी नीरजच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली.
  2. क्लॉस बार्टोनिएत्झ (२०२१–सध्या): बायोमेकॅनिक्समधील तज्ञ, सध्या बारटोनिट्झ नीरजला प्रशिक्षण देत आहेत, त्याला त्याची  टेक्निक सुधारण्यात मदत करत आहेत. भारतीय ऍथलेटिक्सचा  नीरज चोप्राने आपल्या कारकिर्दीत खूप महत्वपूर्ण कामगिरी केली आहे.

नीरज चोप्रा जिंकलेल्या सुवर्णपदकांची यादी | Neeraj Chopra: List of Gold Medals Won

नीरज चोप्राने लहान भाला फेकून आपला एथिलिट्सचा  (athlete) प्रवास सुरू केला. 2016 मध्ये, त्याने जागतिक अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटरचा जागतिक U20 विक्रम रचला , या जागतिक स्पर्धेत विक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याचे कौशल्य, प्रतिभा आणि समर्पण या सर्व गोष्टीमुळे पुरुष ऑलिम्पिक चॅम्पियन आणि भालाफेकीत भारत जागतिक विजेते बनले (Neeraj Chopra Information In Marathi)

  1. ऑलिम्पिक खेळ (टोकियो 2020) :- टोकियो ऑलिम्पिक २०२१ | Tokyo Olympics 202 नीरज चोप्राने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. त्याने ८७.५८ मीटर भाला फेकून केवळ ऑलिम्पिक सुवर्णच मिळवले नाही तर नवा विक्रमही रचला होता.
  2. ऑलिम्पिक खेळ (Paris Olympic 2024)नीरज चोपड़ा सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्यात अपयशी ठरला, आणि त्याच्या कारकिर्दीतील दुसऱ्या सर्वोत्कृष्ट 89.45 मीटर फेक असूनही, पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या 90 मीटरच्या दोनदा फेक केलेल्या विक्रमी प्रदर्शनापुढे ते अपुरे पडले. नदीमने या फेकीने एक नवीन ऑलिम्पिक विक्रम देखील प्रस्थापित केला. 26 वर्षीय नीरज चोपड़ा दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. टोकियो 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता त्याने रौप्यपदकाची भर घातली आहे. यापूर्वी नॉर्मन प्रिचार्ड, सुशील कुमार, पी. व्ही. सिंधू आणि मनू भाकर या खेळाडूंनी हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, मनू भाकरने पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक मिळवली आहेत. सुशील कुमार आणि पी. व्ही. सिंधू यांच्या सोबत नीरज चोपड़ा हा दोन वेगवेगळ्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणारा तिसरा खेळाडू बनला आहे.
  3. जागतिक चॅम्पियनशिप (यूजीन 2022 आणि बुडापेस्ट 2023)– यूजीन, ओरेगॉन येथे 2022 च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने 86.69 मीटर (नवीन वैयक्तिक सर्वोत्तम) भाला फेक करून रौप्य पदक आपल्या नावावर केले होते. 2023 मध्ये, बुडापेस्ट येथे जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय ठरला होता.
  4. डायमंड लीग – नीरज चोप्राने ऑगस्ट 2022 मध्ये लॉसने लेग जिंकून पहिल्या डायमंड लीग विजेतेपद आपल्या नावावर केले. पुढे त्याच वर्षी त्याने त्याच ठिकाणी आणखी एक विजय आपल्या नावावर केला.
  5. आशियाई खेळ (2018) – जकार्ता येथे झालेल्या 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने भालाफेकमध्ये सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
  6. राष्ट्रकुल खेळ (2018)- गोल्ड कोस्ट येथे 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देखील त्याने आणखी एक सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
  7. इतर महत्वपूर्ण कामगिरी: नीरज चोप्रानेआशियाई चॅम्पियनशिप (2017), वर्ल्ड U20 चॅम्पियनशिप (2016), आणि दक्षिण आशियाई गेम्स (2016) मध्येही त्याने सुवर्णपदके तसेच इतर पदके जिंकली आहेत.
Neeraj Chopra: List of Gold Medals Won

नीरज चोप्रा पुरस्कार | Neeraj Chopra: Award

नीरज चोप्रा, भारतीय ट्रॅक आणि फील्ड खेडाळु, यांनी त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीसाठी अनेक पुरस्कार तसेच अनेक सन्मानही मिळवले आहेत. 

  1. अर्जुन पुरस्कार (2018) – नीरज चोप्राला 2018 मध्ये कीर्तिमान अर्जुन पुरस्कार मिळाला होता.हा राष्ट्रीय पुरस्कार भारतातील उत्कृष्ट खेळाडूंना त्यांच्या विलक्षण कामगिरीसाठी आणि खेळातील योगदानासाठी दिला जातो.
  2. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (2021)- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असून भालाफेकीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नीरज चोप्राला 2021 मध्ये या कीर्तिमान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  3. पद्मश्री (२०२२) – नीरज चोप्रा पद्मश्री Neeraj Chopra Padma Shri :- 2022 मध्ये, नीरज चोप्राला पद्मश्री, भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले होते. हा पुरस्कार भारतीय क्रीडा आणि त्याच्या इतिहासप्रसिद्ध ऑलिम्पिक सुवर्णपदकावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतो .
  4. इतर प्रमुख सन्मान: नीरजला 2020 मध्ये विष्टक सेवा पदकाने गौरवण्यात आले  (VSM) आणि 2022 मध्ये त्याला परम विशिष्ट सेवा पदक (PVSM) देखील मिळाले.
Neeraj Chopra: Award

नीरज चोप्रा ब्रँड व्हॅल्यू | Neeraj Chopra Brand Value

भारतीय ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट नीरज चोप्रा याने केवळ आपल्या लक्षणीय कामगिरीने इतिहासच नाही रचला  तर तो फेमस ब्रँडचा ब्रँड ॲम्बेसेडर देखील बनला आहे. चला त्याची निव्वळ संपत्ती बघूया (Net worth of neeraj chopra). 

एकत्रित किंमत – 2023 पर्यंत, नीरज चोप्रा यांची भारतीय रुपयात निव्वळ संपत्ती |  neeraj chopra net worth in indian rupees नीरज चोप्राची अंदाजे सर्व मिळून संपत्ती ₹37.17 कोटी इतकी आहे. हरियाणातील एका सामान्य कुटुंबातून ते ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता होण्यापर्यंतचा त्याचा प्रवासत त्याच्या संपत्ती वाढीत  महत्त्वपूर्ण योगदान आहे. पगार-नीरज चोप्राचा वार्षिक पगार आणि त्याच्या मॅचची फी एकत्रितपणे अंदाजे 4 कोटी आहे. तरी हा पगार त्याच्या एकूण संपत्तीचा खूप छोटासा भाग आहे. २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहासप्रसिद्ध सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये खूपच वाढ झाली. क्रॉलच्या सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट 2022 च्यानुसार, त्याचे ब्रँड मूल्य सुमारे  $26.5 दशलक्ष इतके प्रभावी वाढ झाली आहे. निरज चोप्रा आजून काही प्रमुख ब्रँड्समध्ये हे समाविष्ट आहे जसे की १.टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स २.जिलेट ३.देश आनंद ४.कोका कोला इत्यादी. नीरज चोप्राच्या कामगिरी आणि यशामुळे त्याचे समर्थन मूल्य वाढतच आहे!

नीरज चोप्रा कार कलेक्शन | Neeraj Chopra Car Collection

1. फोर्ड मस्टँग जीटी – नीरज हा निळ्या रंगाच्या अमेरिकन मसल कारचा मालक आहे. भारतात त्याची किंमत सुमारे  74.61 लाख रुपये इतकी आहे.

2.रेंज रोव्हर स्पोर्ट – हि कार फक्त 4.7 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवू शकते आणि तिचा  कमाल  वेग 260 किमी/ताशी आहे.

3.महिंद्रा XUV700- भारतीय उद्योगपती श्री आनंद महिंद्रा यांनी नीरजला त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवीन आणि खास डिझाइन केलेली महिंद्रा XUV700 भेट दिली होती.

सध्या नीरजच्या कार कलेक्शनमध्ये ह्या कार समाविष्ट आहेत. 

FAQ

नीरज चोप्रा बाईक | Neeraj Chopra Bike

हार्ले डेव्हिडसन 1200 रोडस्टर – नीरज सध्या या अमेरिकन बाईकचा मालक आहे.
यात 1200cc इंजिन आहे, ज्याची किंमत सुमरे 11 लाख रुपये इतकी  आहे.
बजाज पल्सर 220F – ही भारतीय बाईक नीरजच्या नॉन-प्रिमियम बाइक या कलेक्शनमध्ये सामील आहे.
त्याची किंमत सुमारे 1.४0 लाख रुपये पर्यंत आहे.

KBC नीरज चोप्रा भाग | KBC Neeraj Chopra Episode

नीरज चोप्रा यांनी लोकप्रिय टेलिव्हिजन क्विझ शो कौन बनेगा करोडपती (KBC) २०२१ मध्ये आपली विशेष उपस्थिती लावली.
एपिसोड तारीख: 17 सप्टेंबर 2021
क्विझ शो चे नाव : कौन बनेगा करोडपती सीझन 13
प्रमुख पाहुणे: भारतातील पहिला ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट नीरज चोप्रा आणि पी.आर. श्रीजेश  “भारताची महान भिंत” असे टोपणनाव असलेले श्रीजेशने टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कांस्यपदक-विजेत्या हॉकी मोहिमेत त्यांनी आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

नीरज चोप्राची मैत्रीण | Neeraj Chopra Girlfriend

नीरज चोप्राला सध्या कोणतीही मैत्रीण नाही ये . तो म्हणाला होता की सध्या त्याचे लक्ष फक्त खेळावर आहे आणि तो अधिक इम्प्रोव्ह होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे.

नीरज चोप्रा विवाहित आहे | Is Neeraj Chopra Married

नाही , नीरज चोप्रा अविवाहित आहे पण तो लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. 

नीरज चोप्रा कोणत्या जातीचा आहे? | Neeraj Chopra belongs to which caste

नीरज चोप्रा हा रोर समुदाया  मधून  येतो , रोर-मराठे हे 1761 च्या हरियाणातील  पानिपतच्या युद्धात लढलेल्या मराठा सैनिकांचे वंशज आहेत.

नीरज चोप्रा यांनी जिंकलेले पुरस्कार | Awards won by Neeraj Chopra

१. अर्जुन पुरस्कार (2018)
२. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (2021)
३.पद्मश्री (२०२२)
नीरजला 2020 मध्ये विष्टक सेवा पदकाने गौरवण्यात आले  (VSM) आणि 2022 मध्ये त्याला परम विशिष्ट सेवा पदक (PVSM) देखील मिळाले.

नीरज चोप्राची उंची सेमी किती आहे. | What is the height of Neeraj Chopra in cm

नीरज चोप्रा ची उंची अंदाजे 180 सेंटीमीटर सेमी उंच आहे, जे  1.80 मीटर  किंवा 5 फूट 11 इंच आहे.

नीरज चोप्राचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स | Neeraj Chopra Instagram Followers

आधी इन्स्टाग्रामवर नीरजचे सुमारे 100,000 फॉलोअर्स होते.
सुवर्ण जिंकल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत, त्याने 2.2 दशलक्ष फॉलोअर्स मिळवले, ज्यामुळे त्याची Instagram1 वर एकूण संख्या 3.2 दशलक्ष झाली आहे. सध्या, नीरज चोप्राच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 7.2 दशलक्ष  आहे.

Neeraj Chopra is related to which sports

नीरज चोप्राने लहान भाला फेकून आपला एथिलिट्सचा  (athlete) प्रवास सुरू केला. 2016 मध्ये, त्याने जागतिक अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटरचा जागतिक U20 विक्रम रचला , या जागतिक स्पर्धेत विक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याचे कौशल्य, प्रतिभा आणि समर्पण या सर्व गोष्टीमुळे पुरुष ऑलिम्पिक चॅम्पियन आणि भालाफेकीत भारत जागतिक विजेते बनले

READ MORE

1.N. R. Narayana Murthy information in Marathi

2.सुनीता विल्यम्स Sunita Williams information in Marathi

3.स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती | Veer Savarkar Information in Marathi

Leave a Comment