Manu Bhaker Information in Marathi | Childhood and education of Manu Bhaker | Manu Bhaker’s Early Playing Life | Manu Bhaker Performance in International Shooting Competitions | Manu Bhaker Medal List | Paris Olympic 2024 : final Manu Bhaskar score
मनु भाकर ही एक भारतीय नेमबाज आहे जिने आपल्या अवघ्या तरुण वयात आंतरराष्ट्रीय नेमबाजीमध्ये अनेक विक्रम नोंदवले आहेत. तिचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 रोजी हरियाणा राज्यातील गोरिया गावात झाला. ती भारतीय नेमबाजीकडील एक उत्कृष्ट खेळाडू आहे जिने आपल्या कौशल्याने जगभरातील नेमबाजी प्रेमींचं लक्ष वेधलं आहे.
मनू भाकर ही हरियाणाची भारतीय नेमबाज आहे आणि 2018 ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी आणि दोन सुवर्णपदके जिंकणारी सर्वात तरुण भारतीय आहे. 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वयाच्या 16 व्या वर्षी तिने महिलांच्या 10 मीटर पिस्टन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
मनु भाकरचं बालपण आणि शिक्षण | Childhood and education of Manu Bhaker
मनु भाकरचं बालपण हरियाणाच्या झज्जर चा गोरिया गावातच झालं. तिचे वडील रामकृष्ण भाकर हे मरीन इंजिनियर होते आणि आई सुमेधा ही शिक्षिका होती. मनुने आपलं प्राथमिक शिक्षण हरियाणातील एका छोट्याशा शाळेत घेतलं. ती नेहमीच खेळात रुची घेणारी मुलगी होती.
मनु भाकरचं प्रारंभिक खेळ जीवन | Manu Bhaker’s Early Playing Life
मनु भाकरचं खेळातलं प्रारंभिक जीवन विविध खेळांमध्ये होतं. ती तायक्वांडो, बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंगमध्येही पारंगत होती. तिने स्केटिंगमध्ये नॅशनल लेव्हलवर पदक जिंकले आहेत. तथापि, तिचा खरा ओढा नेमबाजीकडे होता. एके दिवशी मनू भाकर ही आपल्या वडिलांबरोबर शूटिंगच्या एरिया मध्ये गेले होते त्यावेळेस मनूला शूटिंग करण्याची इच्छा झाली तिने पिस्तोल घेऊन काही राऊंड फायर केले त्यावेळेस तिने दहा नंबर या निशाणा वरती अचूक नेम साधला हे बघून तिच्या वडिलांनी तिला नेमबाजी करण्यासाठी प्रोत्साहन प्रोत्साहन दिलं. (Manu Bhaker Information in Marathi)
मनु भाकरचं नेमबाजीची सुरुवात | Manu Bhaker shooting start
मनु भाकरने 2017 मध्ये 15 वर्षांच्या वयात नेमबाजीला सुरुवात केली. ती नेमबाजीची आवड ओळखून तिच्या वडिलांनी तिला योग्य प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. तीने आपल्या कठोर परिश्रमाने आणि दृढ इच्छाशक्तीने तिला संधी मिळालेल्या प्रत्येक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली.
पूर्ण नाव | मनु भाकर |
जन्म तारीख | १८ फेब्रुवारी २००२ |
जन्म ठिकाण | झज्जर हरियाणा, भारत |
वय (२०२२ पर्यंत) | २० वर्षे |
उंची | १.६३ मी |
शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र | युनिव्हर्सल सीनियर सेकंडरी स्कूल |
प्रशिक्षक | जसपाल राणा |
खेळ | नेमबाजी, बॉक्सिंग, टांगटा, ज्युडो-कराटे (आंतरराष्ट्रीय स्तर) |
आईचे नाव | सुमेधा भाकर |
वडिलांचे नाव | राम किशन भाकर |
ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप (मेक्सिको ग्वाडालजारा) | सुवर्णपदक (१० मीटर एअर पिस्तूल नेमबाजी) |
आशियाई नेमबाजी स्पर्धा | रौप्य पदक (पिस्तूल नेमबाजी) |
मनु भाकरचं आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांतील कामगिरी | Manu Bhaker Performance in International Shooting Competitions
मनु भाकरने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात 2018 मध्ये केली. तिने मेक्सिकोतील ISSF विश्व चषकात 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी कारकिर्दीची धडाक्यात सुरुवात केली. ती पहिली भारतीय महिला ठरली जिने विश्व चषकाच्या पदार्पणातच सुवर्णपदक जिंकले.
मनु भाकरने 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तिने 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही 10 मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. तिच्या या कामगिरीमुळे ती जागतिक पातळीवर नेमबाजीत उभरून आली.
मनु भाकरने 2019 च्या ISSF विश्व चषकात 10 मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिच्या या कामगिरीमुळे ती 2020 च्या टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरली.
मनु भाकरच्या प्रवासात अनेक आव्हानं होती. तिने आपल्या मेहनतीने आणि धैर्याने सर्व आव्हानं पेलली. तिच्या खेळातील तंत्रज्ञान सुधारण्यासाठी तिने विविध प्रशिक्षकांशी काम केलं. तिच्या कुटुंबानेही तिला नेहमीच पाठिंबा दिला.
मनू भाकर ने आता पर्यंत ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि ७० राष्ट्रीय पदके जिंकली असून २०२१ च्या ऑलिम्पिकमध्ये ती सातव्या स्थानावर राहिली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेणारी २२ सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव खेळाडू आहे. मनू भाकरने हिने शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंगसह अनेक खेळांमध्ये भाग घेत असत. बॉक्सिंग खेळताना तिच्या डोळ्याला इजा झाली. यानंतर तिचा बॉक्सिंगमधील प्रवास तेथेच संपला. त्याचबरोबर, मनूला इतरही वेगळ्या खेळांची देखील आवड होती, ज्यामुळे ती एक उत्कृष्ट नेमबाज बनण्यात यशस्वी झाली. आता तिने आपल्या प्यारा भारतसाठी पदक जिंकलं आहे.
मनु भाकरची कामगिरी अनेक युवा नेमबाजांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या यशामुळे भारतातील नेमबाजीत नवचैतन्य आलं आहे. ती भारतीय नेमबाजीत एक नवा अध्याय लिहित आहे. या पूर्वी जागतिक नेमबाजीत देखील भारतीय नेमबाज मनू भाकरनं हिने आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली असून. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला हिला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देखील वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं. (Manu Bhaker Information in Marathi)
मनु भाकर पदक सूची | Manu Bhaker Medal List
ISSF World Cup Final | |||
सुवर्ण | 2019 | Putian China | 10m air pistol |
सुवर्ण | 2019 | Putian China | 10m air pistol mixed team |
सुवर्ण | 2018 | Guadalajara | 10 m air pistol |
रौप्य | 2021 | New Delhi | 10m air pistol |
सुवर्ण | 2018 | Guadalajara | 10 m air pistol mixed team |
सुवर्ण | 2019 | New Delhi | 10 m air pistol mixed team |
सुवर्ण | 2019 | Beijing | 10m air pistol mixed team |
सुवर्ण | 2019 | Munich | 10m air pistol mixed team |
सुवर्ण | 2019 | Rio de Janeiro | 10m air pistol mixed team |
सुवर्ण | 2021 | New Delhi | 10 m air pistol mixed team |
Asian Shooting Championships | |||
सुवर्ण | 2019 | Doha | 10 m air pistol |
सुवर्ण | 2019 | Doha | 10 m air pistol mixed team |
Asian Airgun Championships | |||
सुवर्ण | 2019 | Taoyuan Taiwan | 10m air pistol |
सुवर्ण | 2019 | Taoyuan Taiwan | Mixed team 10m air pistol |
Commonwealth games | |||
सुवर्ण | 2018 | Goldcoast | 10 m air pistol |
Youth Olympic Games | |||
सुवर्ण | 2018 | Buenos Aires | 10 m air pistol |
रौप्य | 2018 | Buenos Aires | 10 m air pistol mixed team |
ISSF Junior World Cup | |||
सुवर्ण | 2018 | Sydney | 10m air pistol |
सुवर्ण | 2018 | Suhl | 10m air pistol |
सुवर्ण | 2018 | Sydney | Mixed team 10m air pistol |
रौप्य | 2018 | Suhl | Mixed team 10m air pistol |
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : मनु भाकरअंतिम स्कोअर | Paris Olympic 2024 : final Manu Bhaker score
मनू भाकर हिने शेवटच्या सामन्यात २२१.७ गुणांसह कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक असून. मनू भाकर २१व्या शॉटने दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती, परंतु अखेरीस ती तिसऱ्या स्थानावर राहिली. कोरियाच्या दोन्ही नेमबाजांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. मनू भाकर ही भारताला नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. स्पर्धेत सुरूवातीपासूनच मनू दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी कायम होती परंतु अवघ्या एका पॉईंटने मनू मागे राहिली. पण तिने भारताला कास्य पदक पटकावून दिलं.
मनू भाकर ने पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये इतिहास रचला & हे पदक खूप खास आहे कारण हे या कॅटेगरी मध्ये पदक जिंकणारी पहिली महिला आहे.
पहिली 5 शॉट सीरीज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4
दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9
उर्वरित शॉट्स: 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3
मनु भाकरने 2024 पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारतीय नेमबाजी क्षेत्रात एक नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. तिच्या यशस्वी कामगिरीने ती आज भारतीय क्रीडा क्षेत्रात एक मान्यवर नाव बनली आहे. तिच्या या प्रेरणादायी प्रवासामुळे ती अनेकांसाठी आदर्श बनली आहे.
2021 मधे झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूचं पिस्तूल तुटलं होत, त्यामुळे तिला 20 मिनिटे सामना खेळताच आला नाही. पिस्तूल दुरुस्त केल्यानंतरही मनूला मोजून 14 शॉट्सच मारता आले होते, यामुळे मनू अंतिम शर्यतीतून बाहेर पडली. टोकियो ऑलिम्पिकमधल्या या कामगिरीने मनू खूप निराश झाली होती, पण यंदा तिने मागच्या कामगिरीची व्याजासह परतफेड केली आहे.
FAQ
Manu Bhaker won which gold medal in Olympics?
Manu Bhaker हिने शेवटच्या सामन्यात २२१.७ गुणांसह कांस्यपदक जिंकले.मनू भाकर ही भारताला नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे.
Read More
1.नीरज चोप्रा यांची संपूर्ण माहिती | Neeraj Chopra Information In Marathi