Atharva Taide Information In Marathi

अथर्व तायडे | Atharva Taide Information In Marathi – अथर्व तायडे हा अकोला, महाराष्ट्रातील एक प्रतिभावान डावखुरा फलंदाज व अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ३६ चेंडूत ६६ धावांची शानदार खेळी करून तो सर्वांच्या नजरेत आला. पण ही यशाची पायरी गाठण्यासाठी त्याने एक प्रदीर्घ संघर्ष केला आहे.

Atharva Taide childhood | अथर्व तायडे यांचे बालपण

अथर्व तायडे यांची कहाणी जणू काही प्रेरणादायी वाटावी अशीच आहे. त्यांचा जन्म २६ एप्रिल २००० रोजी महाराष्ट्रातील अकोला या शहरात एका मराठा कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील डॉ. ययाती तायडे हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील वनशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक आणि अधिष्ठाता आहेत. घरात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे, अथर्वलाही अभ्यास आणि खेळ यांचा समतोल लावायला लवकरच शिकवले गेले.

त्यांची आई देवयानी तायडे यांनी पूर्वी भूधान फंडामेंटल्स ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये संचालक पद भूषवले होते – त्यामुळे पर्यावरण आणि शाश्वत ऊर्जेच्या विचारांचे संस्कारही त्यांच्यावर नकळत झाले असावेत.

अथर्वची मोठी बहीण वैभवी तायडे हिचा देखील मार्ग खूप प्रेरणादायी आहे. ती एक पेट्रोलियम इंजिनीअर असून, पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये पेट्रोलियम इंजिनीअरिंगमध्ये एम.टेक. करत आहे. घरात शिक्षणाची अशी पार्श्वभूमी असताना अथर्वने मात्र क्रिकेटमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

अथर्वने शिक्षणाची सुरुवात नागपूरमधील बिशप कॉटन स्कूलमध्ये केली होती. त्यानंतर त्यांनी पुढचं शिक्षण डॉ. आंबेडकर कॉलेज, नागपूर येथून पूर्ण केलं. शिक्षण घेता घेता त्यांनी मैदानावरही तितक्याच ताकदीने स्वतःचा ठसा उमटवला आणि आज तो देशाच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो.

Atharva Taide Introduction :-

विषयमाहिती
पूर्ण नाव_Atharva Taide full nameअथर्व ययाती तायडे
जन्म तारीख_Atharva Taide birth date२६ एप्रिल २०००
जन्म स्थान_Atharva Taide birth placeअकोला,महाराष्ट्र
कुटुंब_Atharva Taide Familyआई – देवयानी तायडे, बहीण-वैभवी तायडे
राष्ट्रीयता_Atharva Taide nationalityभारतीय
व्यावसायिक क्षेत्र_Atharva Taide occupationक्रिकेट
पदडावखुरा फलंदाज व अष्टपैलू    
आंतरराष्ट्रीय पदार्पणODI, Test & T20 – अजून खेळलेला नाही

Atharva Taide beginning of cricket | अथर्व तायडे क्रिकेटची सुरुवात आणि वडिलांचे योगदान

अथर्वने लहानपणी गल्ली क्रिकेटपासून क्रिकेटचा श्रीगणेशा केला. त्याच्या वयाच्या ८-९ व्या वर्षीच त्याच्या वडिलांना जाणवले की अथर्व ला जर मोठा क्रिकेटर व्हायचं असेल तर त्याला वरचा लेव्हल च क्रिकेट शिकवाव लागेल म्हणून त्यांनी अथर्वला नागपूरला एका समर कॅम्पमध्ये दर वर्षी पाठवायला सुरवात केली.

जेव्हा अथर्व ११ वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांनी अकोलाच्या घरी बॉक्स नेट तयार केली आणि बॉलिंग मशीन खरेदी केली. दिवसभर ग्राउंडवर प्रॅक्टिस केल्यानंतरही अथर्व घरीही त्याच उत्साहाने सिमेंट पिचवर सराव करत असे.

Atharva Taide beginning of cricket

Atharva Taide – Contribution of Akola Cricket Club | अथर्व तायडे – अकोला क्रिकेट क्लबचे योगदान

अथर्व अकोला क्रिकेट क्लबमध्ये भरत डीकर सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करत असे. भरत डिक्कर  सरांनी क्लबचे ग्राउंड उत्तम प्रकारे जपले होते. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून अनेक गुणी खेळाडू घडले आणि त्यात अथर्वचा देखील समावेश होता.

प्रवीण मुुळे, सनद डोंगरे, नंदू गोरे सर यांचंही अथर्वच्या घडणीत मोलाचं योगदान आहे. त्यांचं मार्गदर्शन अथर्वसाठी खूप उपयुक्त ठरलं.

अकोला या छोट्या शहरात क्रिकेटचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दोन तरुणांची निवड विदर्भ संघासाठी झाली, आणि त्यातला एक नाव आज साऱ्यांच्या ओठांवर आहे – अथर्व तायडे.

१४ वर्षांखालील राजसिंग डुंगरपूर चषक स्पर्धा नागपूरमध्ये २७ जानेवारी २०१४ रोजी सुरू झाली होती आणि या महत्त्वाच्या दोन दिवसीय स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या विदर्भ संघात अकोला क्रिकेट क्लबच्या दोन खेळाडूंना स्थान मिळालं होतं – अथर्व तायडे आणि नयन चव्हाण.

या संघाचं खास वैशिष्ट्य म्हणजे अथर्व तायडेची कर्णधारपदी निवड. होय! अकोल्याच्या या तरुण खेळाडूकडे संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्याने आपल्या खेळाच्या जोरावर ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती.

मध्य प्रदेशात पार पडलेल्या मागील स्पर्धेत अथर्व आणि नयन दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यानंतर नागपूरमध्ये झालेल्या निवड चाचणी सामन्यांतही त्यांनी आपली गुणवत्ता पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध केली होती.

Atharva Taide – Century against Chhattisgarh | अथर्व तायडे – छत्तीसगडविरुद्ध झळकलेलं दमदार शतक

स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात, जेव्हा विदर्भचा सामना छत्तीसगड संघाशी झाला होता, तेव्हा अथर्वने पुन्हा एकदा आपल्या नावाला साजेशी खेळी केली होती — तब्बल १२५ धावांची झणझणीत इनिंग त्याने साकारली होती.

ही खेळी केवळ त्याचं वैयक्तिक कौशल्य दाखवणारी नव्हती, तर एका जवाबदारीने खेळणाऱ्या युवा कर्णधाराची ओळख करून देणारी होती. संघाच्या गरजेनुसार खेळताना त्याने आपल्या नेतृत्वाचं खऱ्या अर्थाने चीज केलं होतं.

Atharva Taide Taide अकोला क्रिकेट क्लबचा अभिमान

अथर्व आणि नयनच्या या निवडीनं अकोला क्रिकेट क्लबमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं.

क्लबचे अध्यक्ष नानुभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख यांच्यापासून ते मार्गदर्शक भरत डिक्कर सर, नंदू गोरे, परिमल कांबळे, जावेद अली, सुमेद डोंगरे आणि इतर सदस्यांनी या दोघा खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला होता. या कामगिरीनं संपूर्ण अकोल्याचा अभिमान उंचावला होता.

नागपूर VCA (Vidarbha Cricket Association) चे योगदान

तिथे चंदू सर आणि वसीम जाफर यांचं मार्गदर्शन लाभलं, ज्यांनी त्याचं तंत्र आणि दृष्टिकोन अधिक प्रगल्भ केला. वसीम जाफरसारख्या महान फलंदाजाकडून मिळालेली शिकवण अथर्वसाठी प्रेरणास्थान ठरली.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये यश

  • 2018: कूच बेहर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध 320 धावांची विक्रमी खेळी.
  • डिसेंबर 2018: प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गुजरातविरुद्ध पदार्पण.
  • फेब्रुवारी 2019: टी-20 मध्ये हिमाचलविरुद्ध पदार्पण.
  • 2021: विजय हजारे ट्रॉफीत आंध्रविरुद्ध नाबाद 164 धावांची सर्वोच्च खेळी.
  • इराणी ट्रॉफी (2019): दुसऱ्या डावात सामना जिंकणारी 72 धावांची खेळी.

आयपीएलमधील प्रवास

  • 2022: पंजाब किंग्जने अथर्वला 20 लाख रुपयांत खरेदी केलं.
  • 2023: एलएसजी विरुद्ध ३६ चेंडूत ६६ धावा — मोठ्या मंचावर स्वतःची छाप सोडली.
  • 2025: सनरायझर्स हैदराबाद संघाने अथर्वला आपल्याकडे घेतलं.

विदर्भाचा उदयोन्मुख क्रिकेटपटू अथर्व तायडे हा डावखुरा फलंदाज असून त्याचबरोबर डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स शैलीत फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील खऱ्या प्रसिद्धीची सुरुवात २०१८ साली झाली, जेव्हा त्याने कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध अविस्मरणीय ३२० धावा ठोकल्या. या ऐतिहासिक खेळीने त्याचे नाव संपूर्ण देशांतर्गत क्रिकेट विश्वात उजळून निघाले आणि त्याला एक गंभीर, गुणी युवा प्रतिभा म्हणून ओळख मिळाली.

या शानदार प्रदर्शनानंतर त्याच्या आयपीएल प्रवासाची दारे उघडली गेली. २०२२ ते २०२४ या कालावधीत अथर्व तायडे पंजाब किंग्ज (PBKS) संघाचा भाग होता. जरी त्याला सातत्याने खेळण्याची संधी मिळाली नसली तरी त्याने मिळालेल्या मर्यादित सामन्यांत प्रभावी कामगिरी केली. त्याने सुमारे १५० धावा करत संघासाठी काही महत्त्वपूर्ण कॅमिओ खेळले, जे सामन्याच्या निर्णायक क्षणांना उपयुक्त ठरले.

त्याच्या या स्थिर आणि प्रभावी कामगिरीवर लक्ष ठेवत सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि २०२५ च्या टाटा आयपीएलपूर्वी ३० लाख रुपयांच्या बोलीत त्याला संघात सामील करून घेतले. ही निवड केवळ त्याच्या प्रतिभेवर शिक्कामोर्तब करणारी ठरली नाही, तर त्याच्या क्रिकेट प्रवासात एक नवी दिशा दर्शवणारी ठरली.

अथर्व तायडेचा क्रिकेटमधील प्रवास सातत्याने मेहनत, धैर्य आणि संधी मिळाल्यास ती दोन्ही हातांनी पकडण्याच्या वृत्तीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. सनरायझर्स हैदराबादच्या संघात त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा ठेवली जात आहे.

अथर्व तायडेचा प्रवास हा सरळ नव्हता – पण चिकाटी, कौटुंबिक पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर त्याने भारतीय क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. लवकरच तो टीम इंडियातही झळकू शकतो, अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा आहे.

FAQ

अथर्व तायडे कुठल्या IPL संघाकडून खेळतो आणि कोणत्या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली?

अथर्व तायडे IPL 2023 मध्ये पंजाब किंग्ज संघाकडून खेळतो. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ३६ चेंडूत ६६ धावा करत चमकदार खेळी केली होती.

अथर्व तायडे यांचे शिक्षण कोणत्या शाळा आणि कॉलेजमध्ये झाले?

अथर्वने शिक्षणाची सुरुवात बिशप कॉटन स्कूल, नागपूर येथून केली आणि पुढे डॉ. आंबेडकर कॉलेज, नागपूर येथून उच्च शिक्षण पूर्ण केले.

अथर्व तायडे यांचे वडील कोण आहेत आणि त्यांचा काय व्यवसाय आहे?

अथर्व तायडे यांचे वडील डॉ. ययाती तायडे हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील वनशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक आणि अधिष्ठाता आहेत.

अथर्व तायडेला लहानपणापासून क्रिकेटचे प्रशिक्षण कसे मिळाले?

अथर्वच्या वडिलांनी त्याला नागपूरला समर कॅम्पमध्ये पाठवायला सुरुवात केली. नंतर घरीच बॉक्स नेट व बॉलिंग मशीन घेऊन सिमेंट पिचवर सरावाची सोय केली.

READ MORE

1.मोहम्मद सिराज | Mohammed Siraj Information In Marathi

2.शिखर धवन मराठीत माहिती | Shikhar Dhawan Information In Marathi

3.जसप्रीत बुमराह | Jasprit Bumrah Information In Marathi

Leave a Comment