Dr Babasaheb Ambedkar Mahiti In Marathi
दलित बांधवांचे रक्षणकर्ते आणि कैवारी बनलेल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे आज जगात सर्वोच्च स्थान आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचा नंतर समतेची चळवळ हि जणआंदोलन चळवळ बनली. या चळवळीच्या अंतर्गत बाबा साहेबानी जात,वर्ण व वर्ग यांचा शेवट करण्याचा निर्धार केला.आजच्या या लेख मध्ये आज आपण बाबा साहेबांची जीवनयात्रा व संघर्ष या बद्दल वाचणार आहोत जे कि आपल्याला आपल्या जीवनात खूप प्रेरणादाई ठरू शकतो आणि जीवन जगण्याला एक दिशा देऊ शकते. Dr Babasaheb Ambedkar Mahiti In Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे आणि केव्हा झाला? Dr. Where and when was Babasaheb Ambedkar born?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर जवळील महू येथे झाला त्यांचे मूळ गाव आंबडवे ,जिल्हा रत्नागिरी त्यांचे मूळ नाव भीमराव रामजी सपकाळ उर्फ आंबावडेकर.त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लग्न केव्हा झाले? Dr. When did Babasaheb Ambedkar get married?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वयाच्या 14 व्या वर्षी म्हणजेच 1905 यासाली रमाबाई यांच्याशी विवाह झाला. रमाबाई यांनी बाबा साहेबांच्या प्रत्येक संघर्षात साथ दिली आणि एक समाज सुधारकाची पत्नी म्हणून सर्व कर्तव्य पार पडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शाळा कुठे केली ?Dr. Where did Babasaheb Ambedkar primary school?
बाबासाहेब यांचे प्राथमिक शिक्षणासाठी काही काळ दापोली येथे झाले व त्यानंतर साताऱ्यातील अग्रिकल्चर स्कूल मध्ये प्रवेश घेतला. या शाळेतील आंबेडकर या प्रेमळ गुरुबद्दलच्या आदर व्यक्त करण्यासाठी भीमरावांनी आपल्या गुरूंचे आंबेडकर हे नाव स्वीकारले आणि आपल्या गुरूबद्दल प्रेमभाव व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हायस्कूल बद्दल माहिती ? Dr. Babasaheb Ambedkar High School Information?
1907 मध्ये मुंबईच्या एल्फिस्टंट हायस्कूल मधून मॅट्रिक परीक्षा बाबासाहेबांनी उत्तीर्ण केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉलेज कुठे केली? Dr. Where did Babasaheb Ambedkar College?
एल्फिस्टंट हायस्कूल याच शाळेतील केळुसकर नावाच्या शिक्षकांच्या प्रयत्नाने बाबासाहेबांनी बडोदाधिपती सायाजीराव गायकवाड यांच्या दरमहा रुपये 25 ची शिष्यवृत्ती मिळवली आणि पुढे एलफिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 1913 मध्ये पार्शियन व इंग्रजी हे विषय घेऊन बाबासाहेबांनी एलफिस्टन कॉलेजमधून परीक्षा उत्तीर्ण केली.
नंतर जानेवारी 1913 मध्ये बडोदा संस्थानात त्यांनी काही काळ नोकरी केली; परंतु 2 फेब्रुवारी 1913 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांना पितृशोक झाला त्यानंतर त्यांनी बडोद्या जाण्यास नकारले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणाची माहिती । Dr. Information about Babasaheb Ambedkar Higher Education
1913 ते 1916 या तीन वर्षात बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाड महाराजांच्या मदतीने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. 1915 साली प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध कोलंबीया विद्यापीठात सादर केला व M.A. ची पदवी संपादन केली 1916 साली कोलंबिया विद्यापीठाची पीएचडी मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नॅशनल डिवाइडेड ऑफ इंडिया व हिस्टोरिकल अँड स्टडी (भारताचे राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथकरणात्मक परिशिलन) हा प्रबंध लिहिला.
त्यानंतर बाबासाहेबांनी 1917 मध्ये मुंबईत वर्स कॉलेज या खाजगी व्यापार शिक्षण संस्थेत काही काळ अर्थशास्त्र ,बँकिंग व कायदा या विषयांचे अध्यापन केले. नोव्हेंबर 1918 मुंबईच्या सिडनेहॅन्ड कॉमर्स कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काही काळ नियुक्ती करण्यात आली तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्र हा विषय शिकवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन का गेले ? Dr. Why did Babasaheb Ambedkar go to London?
१९२० या साली राजश्री शाहू महाराज यांच्या साहाय्यामुळे बाबासाहेबांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. यावर्षी राजश्री शाहूच्या आर्थिक साह्यामुळे बाबासाहेब पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. १९२१ साली लंडन विद्यापीठाची एम.एस.सी. पदवी प्राप्त केली. १९२३ मध्ये लंडन विद्यापीठाची डीएससी ही पदवी विषय द प्रॉब्लेम ऑफ रुपी भारतीय रुपयाचा प्रश्न या प्रबंधावर लिहून त्यांनी पदवी मिळवली. याच दरम्यान काही काळ जर्मनीतील बॉन विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला. १९२३ यावर्षी बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
बाबासाहेब भारतात केव्हा आले ? When did Babasaheb come to India?
1924 मध्ये भारतात परतल्यावर काही काळ मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली या पुढील काळात अस्पृश्यता निवारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते या ध्येयासाठी आंबेडकरांनी आपले पुढील जीवन अर्पित केले.
भारतात विविध बाबासाहेबानी समाज कार्य कोणते केले? What social work did various Babasahebs in India?
बहिष्कृत हितकारिणी या सभेची स्थापना । Establishment of Excommunicated Benefactors meeting
१९२४ जुलै या वर्षी मुंबई येथे बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकरणी या सभेची स्थापना केली या सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर तर सचिव हे सिताराम शिवतरकर होते . या हितकारणी सभेची अस्पृश्यता नवजागृती करणे व त्यांची शैक्षणिक प्रगती सुधारणे हा होता.बहिष्कृत हितकरणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी वाचनालय उघडणे ,रात्र शाळा सुरू करणे हे सर्व कार्य केले गेली 1926 मध्ये मुंबई प्रांतांच्या कायदे मंडळाचे सदस्य म्हणून बाबासाहेबांची नियुक्ती करण्यात आली.
समाज समता या संघाची ही स्थापना । The establishment of Samaj Samata Sangh
3 एप्रिल 1927 बहिष्कृत भारत हे पाक्षिक बाबासाहेबांनी चालू केले त्याच वर्षी समाज समता या संघाची ही स्थापना त्यांनी केली. 1928 यावर्षी या संघातर्फे समता जनता व प्रबुद्ध भारत ही पत्रके सुरु करण्यात आली. मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापनाची कार्य बाबासाहेबांनी ह्याच वर्षी चालू केले.
चवदार तळे सत्याग्रह । Tasty tale satyagraha.
20 मार्च 1927 बाबासाहेबांनी आपल्या अनुयासह महाड जिल्हा रायगड येथे चवदार तळे सत्याग्रह केला. 25 डिसेंबर 1927 या दिवशी अस्पृश्यता समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाची बाबासाहेबांनी महाड येथे दहन केले.
काळाराम मंदिर सत्याग्रह । Kalaram Temple Satyagraha
२ मार्च 1930 नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह याचे नेतृत्व गायकवाड यांनी केले व 1935 मध्ये हे मंदिर अस्पृश्यांसाठी खुली करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली हिंदू मंदिर प्रवेशाची चळवळ ही अस्पृश्यांचा सामाजिक गुलामगिरीची बंधने तोडण्यासाठी केलेली चळवळ होती.
स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना । Establishment of Independent Labor Party
नंतर 1930 ते 32 लंडन येथील तिन्ही गोलमेज परिषदांना अस्पृश्यांची प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब उपस्थित होते 25 सप्टेंबर 1932 महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात येरवडा येथे एक करार झाला. बाबासाहेबांनी 15 ऑगस्ट 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली या पक्षाने 1937 च्या प्रांतिक निवडणुका लढवून 13 जागा जिंकल्या 18 जुलै 1942 अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन ची स्थापना नागपूर येथे करण्यात आली.
या काळात गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर मजूर मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली 1946 मध्ये मुंबई येथे पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली या संस्थेमार्फत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज तर औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना करण्यात आली.
हिंदू कोड बिलाची निर्मिती | Creation of Hindu Code Bill
1948 वर्षी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली(अविभक्त कुटुंब पद्धत विरोधी होते स्रियांना व इतर घटकांना समान हक्क मिळणार होती) हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला
बौद्ध धर्माची दीक्षा का घेतली Why was initiated into Buddhism?
नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांची कायदामंत्री म्हणून निवड करण्यात आली. 29 ऑगस्ट 1947 घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची निवड करण्यात आली. 15 एप्रिल1948 डॉक्टर शारदा कबीर या ब्राह्मण विदुषी शी लग्न केले लग्ननंतर सविता आंबेडकर असे नाव त्याच वर्षी बाबासाहेबांनी बिलाची निर्मिती केली(अविभक्त कुटुंब पद्धत विरोधी होते स्रियांना व इतर घटकांना समान हक्क मिळणार होती)
हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयाया सोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर हाच तो दिवस ज्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. येवला येथे १९३५ ची हिंदू धर्म त्यागण्याची प्रतिज्ञा केल्यावर आंबेडकरांनी सुमारे १२ वर्षे बहुतेक सर्व धर्मांचा अभ्यास केला व बौद्ध धर्मात अस्पृश्यतेचे खंडन केलेले आढळल्यामुळे त्यांनी या धर्माचा स्वीकार केला. शीख धर्माचा स्वीकार करावा असे डॉ. बाबासाहेबांच्या मनात होते. मात्र त्यांनी तो निर्णय बाजूला सारला.
बौद्ध धर्माच्या दीक्षेसाठी नागपूरची निवड करण्यामागचे कारण म्हणजे नागा लोकांनी आपल्या या भूमीत बौद्ध धर्माचा प्रसार केला होता.नागपूर येथे त्यांनी व्यापक तत्वावर आधारित नव्या रिपब्लिकन पार्टी या पक्षाची घोषणा केली ;पण त्यांच्या आधीच त्यांचे निधन झाले. 7 डिसेंबर 1956 रोजी मुंबईतील दादर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंतिम संस्कार पार पडले.१९९० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यांनी आपल्या पूर्ण संघर्षाच्या जीवनात खूप सारे ग्रंथ आणि पुस्तके लिहले ज्यांनी अन्यायकारक परंपरांवर वार केले आणि एका नव्या युगाची सुरुवात केली .
डॉ. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा | Dr Babasaheb ambedkar books in Marathi List
- द इव्होल्यूशन ऑफ प्रॉव्हिन्सियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया.
- व्हू वेअर द शुद्राज ? (शुद्र कोण होते?)
- थॉटस् ऑन पाकिस्तान
- रिडल्स इन हिंदूइजम
- कास्ट इन इंडिया
- द प्रॉब्लेम ऑफी
- बुद्ध अँड हिज धम्म (१९५६)
- द अनटचेबल्स
- अॅनिहिलेशन ऑफ कास्टस् (जातीव्यवस्थेचे निर्मूलन)
- अनटचेबल्स अॅण्ड इंडियन कन्स्टिट्युशन
- थॉटस् ऑन लिंग्विस्टिक स्टेटस्
- स्टेट अॅण्ड मायनॉरिटिज्
- फेडरेशन विरुद्ध स्वातंत्र्य (1939)
- द चिल्ड्रेन ऑफ इंडियाज गेट्टो (द अनटचेबल्स) स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया ॲण्ड देअर रिमेडिज् (१९१८)
- अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड फायनान्स ऑफ द इस्ट इंडिया कंपनी
- रानडे, गांधी आणि जीना
- ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हा डॉ. बाबासाहेब यांचा शेवटचा ग्रंथ मृत्यूनंतर प्रकाशित झाला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र: Waiting For A Visa
ब्रिटिशांना भारतातील परिस्थितीचे ज्ञान व्हावे यासाठी डॉ. बाबासाहेबांनी आपले सर्व ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिले
डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता
- मूकनायक (१९२०)
- बहिष्कृत भारत (१९२७),
- जनता (१९३०), समता, प्रबुद्ध भारत
- १९५६ मध्ये जनता या वृत्तपत्राचे नाव बदलून ते ‘प्रबुद्ध भारत’ असे केले.
- मूकनायक पाक्षिकांच्या शिर्षभागी संत तुकारामांची वचने होती (काय करूं आतां धरुनियां भीड…)
- बहुतांश ठिकाणी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक होते असा संदर्भ मिळतो.राजर्षी शाहू महाराज यांनी ‘मूकनायक’साठी रु. २५०० ची आर्थिक मदत केली.
- बहिकृष्त भारत पाक्षिकाच्या शिर्षभागी संत ज्ञानेश्वरांची वचने होती.
- मूकनायकचे पहिले संपादक श्री नंद्र भाटकर. दुसरे संपादक ज्ञानदेव घोलप
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रसिद्ध वचने
- राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरूकिल्ली आहे.
- भाकरी पेक्षा इज्जत प्यारी.
- देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे.
- शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा. (दलित बांधवांना संदेश)
- भिक्षेने गुलामी मिळते, स्वातंत्र्य नाही. •
- आम्हाला सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करा म्हणजे आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून राजकीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करतो.
- ‘राजकीय सत्तेच्या मोक्याच्या आणि महत्त्वाच्या जागा काबीज करा आणि शासनकर्ती जमात बना.’ (दलित बांधवांना आवाहन)
- जर माझ्या मनात द्वेष व सूडबुद्धी असती तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते.
- तिरस्करणीय गुलामगिरी व अन्यायाच्या अमानुष गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास आलो, त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपयशी ठरलो, तर स्वतःलाच गोळी घालीन.
- Relegion is meant for man, but man is not meant for Relegion. ‘वाचन मनाला अन्न पुरविते. या अन्नाचे चर्वण केले तरच ते पचते. अन्न पचले तरच बुद्धी प्रगत होते.’
- ३० मार्च १९२७ रोजी महिलांना उद्देशून : ‘तुमचा नवरा व मुले दारू प्यायली तर त्यांना जेवण देऊ नका.’
आंबेडकरांचे प्रसिद्ध अग्रलेख
- पुनःश्च हरिओम् (बहिष्कृत भारत)
डॉ. आंबेडकरांबद्दल गौरवोद्गार :
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आम्ही शासनकर्ती जमात बनणार (जनता)
- मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार
- ‘दलितांचा मुक्तिदाता’ असा गौरव सयाजीराव गायकवाडांनी केला.
- ‘आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता लाभलेला आहे.’ (१९२० च्या माणगाव परिषदेत राजर्षी शाहू महाराजांचे अस्पृश्यांना आवाहन)
FAQ
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे किती डिग्री होत्या?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अत्यंत विद्यानिधी आणि विचारक होते. त्यांनी मुंबई विश्वविद्यालयातून राजकीय शास्त्रात MA केले, त्यानंतर कोलंबिया विद्यापीठातून PhD प्राप्त केली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून D.Sc. पदवी मिळवली. त्यांच्या शैक्षणिक यशामुळे त्यांनी समाजातील असमानतेविरुद्ध संघर्षात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना किती भाषा येत होत्या?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक भाषांमध्ये प्रावीणता होती. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, संस्कृत, पर्शियन आणि बौद्ध भाषांमध्ये त्यांनी कौशल्य विकसित केले. त्यांच्या भाषाशक्तीमुळे त्यांनी जागतिक स्तरावर विचारवंत आणि समाज सुधारक म्हणून प्रभावी संवाद साधला, ज्यामुळे त्यांच्या कार्याला अधिक प्रभाव मिळाला.
आंबेडकरांचे किती भाऊ आणि बहिणी आहेत?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहा भाऊ आणि दोन बहिणी होती. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे योगदान त्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे होते. आंबेडकरांनी सामाजिक असमानतेच्या विरोधात लढण्यासाठी कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना नेहमीच समर्थन दिले.
Read More
1.अंबानी कुटुंबाची माहिती मराठीत | Ambani Family Information In Marathi