खेळाचा इतिहास | खेळाची उत्पत्ती | लगोरी खेळाची नॅशनल आणि इंटरनॅशनल स्थापना | खेळाचे विविध नाव | Lagori Game Information In Marathi | How is the Game of Lagori Played? | Method of playing lagori
लगोरी हा एक पारंपरिक भारतीय खेळ आहे, जो लहान मुलांच्या खेळांमध्ये विशेषतः खूप लोकप्रिय आहे. हा खेळ सहसा मैदानात खेळाला जातो. आणि हा खेळामध्ये दोन गट असतात. लगोरी हा खेळ विविध नावांनी ओळखला जातो, जसे की सात बाफळे, पिट्टू, डिकोरी, सात टाइल्स इत्यादी. या खेळाची माहिती खालीलप्रमाणे विषयांच्या यादीत दिली आहे:
लगोरी खेळाचा इतिहास | History of Lagori game
लगोरी हा खेळ प्राचीन इतिहास भारतीय संस्कृतीशी निगडित आहे. हा खेळ भारतात हजारो वर्षापुरर्वीपासून खेळाला जात आहे. तसेच भारतीय उपखंडात हा लगोरी खेळाच्या विविध प्रकारचे आवृत्या किंवा भिंत वर चित्र आढळले आहे. आणि प्रत्येक प्रदेशात हा खेळाचे नाव आणि खेळण्याची पद्धत थोडी वेग वेगळी आहे. लगोरी हा खेळाचे प्राचीन उल्लेखांमध्ये हा खेळ शारिरीक तंतुरूस्ती आणि मानसिक चातुर्य वाढवण्यासाठी खेळाला जात असे. ऐतिहासिक काळा नुसार, लगोरी खेळणारे मुले त्यांच्या धावण्याच्या आणि लक्ष्यभेदी क्षमतेत सुधारणा करत असत.
लगोरी खेळाची उत्पत्ती | Origin of Lagori game
लगोरी खेळाची उत्पत्ती भारतात झाली आहे. या खेळाची मूळ कल्पना साठी आहे कि, एकमेकावर रचलेले पाषाणाचे मनोरे उध्वस्त करून परत बांधणे. हा खेळ सहज विविध सणांमध्ये आणि सार्वजनिक समारंभामध्ये खेळाला जात असे. या खेळामुळे मुलांचे शारिरीक क्षमता, धावण्याची गती, आणि नेमबाजीचे कौशल्य वाढते.
लगोरी खेळाची नॅशनल आणि इंटरनॅशनल स्थापना | National and International Establishment of Lagori Game
वर्ष 2008 मध्ये, संतोष गुरव ज्यांनी लगोरी हा पारंपारिक खेळ नॅशनल पर्यंत नाही तर तो इंटरनॅशनल स्थरा पर्यंत पोचवला आणि लोकांना खेळण्यास प्रोत्साहन दिल, संतोष गुरव यांनीच हौशी लगोरी असोसिएशन ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय लगोरी फेडरेशनची स्थापना केली. त्याने 20 पेक्षा जास्त देशांमध्ये, मुख्यत्वे आशिया आणि युरोपमध्ये प्रवास केला आणि या खेळाचा प्रचार आणि स्थापना केली. पण 2017 मध्ये लगोरी स्पर्धेसाठी महाराष्ट्रात जळगावला जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि लगोरी खेळा मोठा धक्का ठरला. परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानाच भाऊ भारत गुरव आणि को फाऊंडर तुषार जाधव हे मैदानात उतरले आणि पुढे त्यांनीच या खेळाची नियमावली बनवली.
2010 मध्ये लगोरी या खेळाची स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय लगोरी फेडरेशनचे 17 देश याचे सदस्य आहेत. लगोरी हा खेळाची चॅम्पियनशिप जून 2013 मध्ये भूतानमध्ये झाली, ज्यामध्ये एकूण 9 देशांनी भाग घेतला होता. (येथे क्लिक करा_Lagori Game Information In Marathi)
लगोरी खेळाचे विविध नाव | Different name of Lagori game
लगोरी हा खेळाचे भारतातील विविध राज्य मध्ये विविध नावे आहेत.
पण खेळाचे नाव बदलेले असेल तरी पण हा खेळण्याची पद्धत आणि नियम साधारणतः समान असतात. प्रत्येक प्रदेशात हा खेळ ला स्थानिक रंग असतो. लगोरी खेळाच्या या विविध नावांनी आणि प्रकारांनी त्याच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधतेचे प्रतिबिंबित केले आहे.
लगोरी चा खेळ कसा खेळला जातो | How is the Game of Lagori Played?
आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहितीच असेल की लगोरी हा खेळ पारंपरिक पद्धतीने कसा खेळला जात असे, परंतु हा खेळ जेव्हा पासून नॅशनल आणि इंटरनॅशनल स्थरावर आला तर त्यावेळेस लगोरी फेडरेशनने या खेळा संबंधित काही नियम हे लोकांसमोर आणले ज्यामुळे हा खेळ आणखीनच रोमांचक झाला. जाणून घेऊया हा खेळ कसा खेळला जातो त्याच मैदान कसे असते आणि यामध्ये किती खेळाडू खेळू शकतात?, कुठल्या कुठल्या प्रकारचे नियम या खेळामध्ये असतात.
लगोरी खेळाचे मैदान | Lagori Playground
मैदान आयताकृती असते, ज्याची लांबी २६ मीटर आणि रुंदी १४ मीटर आहे. मैदान दोन समान भागांमध्ये विभाजित असते, ज्याला मध्यरेषा म्हणतात. मध्यरेषेपासून ३ मीटर अंतरावर दोन्ही बाजूंना एक रेषा आखलेली असते, जी धोक्याची रेषा म्हणून ओळखली जाते. या दोन धोक्याच्या रेषांमधील क्षेत्राला धोक्याचे क्षेत्र म्हणतात. धोक्याच्या रेषेनंतरच्या क्षेत्राला स्ट्राईक/लगोरी ब्रेकर क्षेत्र आणि डिफेन्सिव्ह/हिटर क्षेत्र म्हणतात. ज्या क्षेत्रात पिट्टू / लगोरी पाडणारी टीम उभी राहते, ते स्ट्राईक क्षेत्र आहे, तर ज्या क्षेत्रात डिफेन्सिव्ह/हिटर टीमचा कॅचर उभा राहतो, ते डिफेन्सिव्ह/हिटर क्षेत्र आहे.डिफेन्सिव्ह/हिटर टीमचे खेळाडू स्ट्राईक/लगोरी ब्रेकर क्षेत्रात १x१ मीटरच्या बॉक्समध्ये उभे राहतात, आणि स्ट्राईक/लगोरी ब्रेकर टीमचे खेळाडू डिफेन्सिव्ह क्षेत्रात १x१ मीटरच्या बॉक्समध्ये उभे राहतात.मध्यरेषेच्या मध्यभागी पिट्टू बॉक्स असतो. हा बॉक्स खेळाच्या सुरुवातीस पिट्टू ठेवण्यासाठी वापरला जातो, ज्याचे माप ३०x३० सेंटीमीटर असते.मैदानाच्या तीनही बाजूंना १.५ मीटर अंतरावर जाळी लावलेली असते, ज्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते आणि चेंडू मैदानाबाहेर जाण्यापासून थांबवला जातो.
लगोरी खेळा मध्ये किती खेळाडू असतात | How many players are there in lagori game?
प्रत्येक संघात १५ खेळाडू असतात. ज्यामध्ये ६ खेळाडू मैदानात असतील आणि ६ खेळाडू मैदान चा कडेला मैदान बाहेर बॉल गेलेला देण्यासाठी आणि ३ खेळाडू पर्यायी असतात. आतील ६ खेळाडू पैकी ३ खेळाडू हे स्ट्राईक/लगोरी ब्रेकर बाजूला असतात आणि बाकी ३ खेळाडू हे डिफेन्सिव्ह/हिटर क्षेत्रात तैनात असतात.
लगोरी या मध्ये खेळाडूंची जागा ही साधारणतः वरील दाखवल्याप्रमाणे असते
लगोरी खेळण्याची पद्धत | Method of playing lagori
- स्ट्रायकर संघाला म्हणजे लगोरी चेंडू ने पडणाऱ्या संघाला ब्रेकर्स म्हणतात, आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला म्हणजे चेंडू ने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला चेंडू मारून जो संघ बाद करण्याचा प्रयत्न्न करत असतो त्या संघाला बचावपटू/डिफेन्स/हिटर म्हणून ओळखले जाते. कोणता संघ प्रथम ब्रेकर्सची भूमिका बजावेल या निवडण्यासाठी नाणेफेक केली जाते.
- नाणे फेक करून संघाची निवड झाल्यानंतर, लगोरी तयार करण्यासाठी दगड रचले जातात.
- स्ट्रायकरने फेकलेला चेंडू पकडण्यासाठी बचावपटूं/हिटर पैकी एक 4 फूट अंतरावर दगडांच्या स्टॅकच्या मागे उभा राहतो. इतर खेळाडू कोणत्याही दिशेने चेंडू पकडण्यासाठी लगोरीभोवती विखुरून पोझिशन घेतात.
- सर्व ब्रेकर्स मैदानाच्या ब्रेकर्सच्या भागात क्रीज लाइनच्या मागे त्यांची स्थिती घेतात जसं कि आम्ही तुम्हाला वरील फोटो मध्ये दाखवले.
- ब्रेकरपैकी एक खेळाडू, क्रीज लाइनवरून बॉल फेकून लगोरी फोडण्याचा आणि पडण्याचा प्रयत्न चेंडू मारून करतो आणि खेळ सुरू करतो.
- जर लगोरी विस्कळीत न झाल्यास म्हणजेच लगोरी फोडण्यात/पाडण्यात आणि पहिल्या बाऊन्सनंतर कोणत्याही डिफेंडरने चेंडू पकडला, तर स्ट्रायकरला बाद घोषित केले जाते आणि ब्रेकर्सचा पुढचा खेळाडू स्ट्राइकवर येतो.
- जर लगोरी पडली नाही आणि बचावकर्त्यांनी चेंडू पकडला नाही, तर स्ट्रायकरला स्टॅकवर ठोठावण्याच्या आणखी दोन संधी मिळतात. तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर, त्या स्ट्रायकरची पाळी संपते आणि ब्रेकर्समधील पुढील खेळाडू खेळायला येतो.
- लगोरी तोडण्यासाठी ब्रेकर्सना एकूण नऊ संधी मिळतात – लगोरी तोडण्यासाठी ब्रेकर्सना एकूण नऊ संधी मिळतात – तीन खेळाडूंकडून प्रत्येकी तीन संधी असतात..
- लगोरी पडल्यावर, बचाव करणारे खेळाडू चेंडू पकडतात आणि तो चेंडू ब्रेकर्सना त्यांच्या गुडघ्याखाली किंवा पाठीवर मारण्याचा प्रयत्न करतात.
- त्याच वेळी, ब्रेकर्स लगोरीजवळ जमतात आणि दगड पुन्हा रचण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी वेगाने विखुरण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे कारण बचावपटू त्यांच्याकडे चेंडू फेकत असतात. स्ट्रायकर आणि रीबिल्डर्स चेंडू चुकवताना समन्वय साधतात. हे काम सोपे नाही कारण बचाव करणाऱ्या संघाचा एक सदस्य लगोरीजवळ उभा राहतो आणि सहकाऱ्याकडून चेंडू घेण्याची वाट पाहत असतो.
- लगोरी पुन्हा स्टॅक केल्यावर नंतर ‘लगोरी’ अस ओरडतात. अशा प्रकारे, त्यांना गुण मिळतात आणि स्टॅकवर पुन्हा मारण्याची संधी देखील मिळते.
- जर बचावपटू पुनर्बांधणीपूर्वी कोणत्याही ब्रेकरला मारण्यात यशस्वी झाले, तर ब्रेकर संघ बाद होतो. त्यानंतर चेंडू बचावकर्त्यांकडे जातो आणि पुढील गेममध्ये ते ब्रेकर्स असतात. (Lagori Game Information In Marathi)
लगोरी खेळाचे नियम | Rules of lagori game
लगोरी खेळाचे साधारणतः नियम सोपे आहे. हे नियम खेळाच्या विविध स्थानानुसार थोडेफार बदलू शकतात. परंतु मुख्य नियम कोणते आहे ते खालील प्रमाणे पाहूया.
खेळाच्या नियमांची सविस्तर माहिती | Detailed information on the rules of lagori game
- नियम 1 – गट रचना : लगोरी हा खेळ दोन गटामध्ये खेळाला जातो. प्रत्येक गटात ४ ते ७ किंवा जास्त पण असतात.
- नियम 2 – साधने (वस्तू) :- ७ चीपट दगड किंवा टाइल्स (फरशी ) एकमेकांवर रचून एक डोंगर (मनोरा) तयार केला जातो. चेंडू (अनेकदा रबर बॉल) वापरला जातो. चेंडू (अनेकदा रबर बॉल) वापरला जातो.
- नियम 3 – खेळाची सुरुवात – एक कोणताही गटाने चेंडूने धरून ७ दगड डोंगर (पाषाणांचा मनोरा) उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरा गटाने ७ दगड डोंगर (पाषाणांचा मनोरा) पुन्हा रचायचे करण्याचा प्रयत्न करतो.
- नियम 4 – खेळाची पद्धत – १. पहिला गटाने (उध्वस्त करणारा गट ) चेंडूने ७ दगड डोंगर (पाषाणांचा मनोरा) फेकून तोडतो. २. दुसरा गटाने (रक्षण करणारा गट ) त्वरित चेंडू पकडतो आणि पहिल्या गटाच्या सदस्यांना चेंडू फेकून हिट करतो. ३. उध्वस्त करणारा गट त्वरित पळून ७ दगड डोंगर (पाषाणांचा मनोरा) पुन्हा रचना करण्याचा प्रयन्त करतो.
- नियम 5 – गुणांकन – १. उध्वस्त करणारा गटाचे ७ दगड डोंगर पुन्हा रचायचे करण्यात यशस्वी झाल्यास त्यांना गुण मिळतात. २. रक्षण करणारा गटाचे चेंडूने विरोधी गटाचे सदस्यांचा हिट करून बाहेर काढण्याचा प्रयन्त करतो. बाहेर झालेल्या सदस्यांची खेळ मैदान सोडून मैदानाबाहेर जावे लागते.
- नियम 6 – खेळाची समाप्ती – एका ठराविक वेळेनंतर किंवा दोन्ही गटाचे समान संधी घेतल्यानंतर खेळाचा निकाल ठरवलं जातो. ज्या गटाचे जास्त गुण मिळवले असतील तो गट विजयी ठरतो.
- नियम 7 – चेंडू हाताळणे: जेव्हा बचावकर्त्यांना ब्रेकर्सना मारण्यासाठी चेंडू मिळतो, तेव्हा त्यांनी चेंडूने धावू नये. त्याऐवजी, बॉल असलेल्या खेळाडूने तो थेट ब्रेकर्सवर फेकणे आवश्यक आहे. (येथे क्लिक करा)
पुनर्बांधणी | Reconstruction lagori
- डिफेंडर्सचे (बचावपटू/डिफेन्स/हिटर) काम: लगोरी पडल्यावर, बचाव करणारे खेळाडू चेंडू पकडतात आणि ब्रेकर्सना त्यांच्या गुडघ्याखाली किंवा पाठीवर मारण्याचा प्रयत्न करतात.
- ब्रेकर्सचे काम: ब्रेकर्स लगोरीजवळ जमतात आणि दगड पुन्हा रचण्याचा प्रयत्न करतात.
- स्ट्राईक पूर्ण करणे: लगोरी पुन्हा स्टॅक केल्यावर, तोडणारे त्यांच्या बोटांनी तीन वेळा त्याभोवती एक वर्तुळ काढतात आणि नंतर ‘लगोरी’ असा ओरडतात. अशा प्रकारे, त्यांना एक गुण मिळतो. (Lagori Game Information In Marathi)
आउट होणे | Getting out
डिफेंडर्सचा (बचावपटू/डिफेन्स/हिटर) विजय: जर बचावपटू पुनर्बांधणीपूर्वी कोणत्याही ब्रेकरला मारण्यात यशस्वी झाले, तर ब्रेकर संघ बाद होतो. त्यानंतर चेंडू बचावकर्त्यांकडे जातो आणि पुढील गेममध्ये ते ब्रेकर्स असतात.
खेळाची साधने
लगोरी खेळण्यासाठी विविध प्रकारचे साधने किंवा वस्तू आवश्यक असतात. खालील लागणाऱ्या वस्तूचे माहिती पाहून घ्या.
आवश्यक साधने आणि सामग्री
- पाषाणे (पातळ दगड ) किंवा टाइल्स: लगोरी खेळामध्ये सात पाषाणे ( (पातळ दगड ) किंवा सात टाइल्स वापरल्या जातात.
- चेंडू (बॉल): चेंडू सहसा रबराचा किंवा प्लास्टिकचा असतो. चेंडू हलका असतो. जेणे करून खेळाडूला त्याला सहज फेकू आणि पकडू शकतील.
- खेळाचे मैदान: लगोरी हा खेळ मोकळ्या मैदानावर असू शकते. साधारणतः पणे मैदानाची जागा ३० x ३० फिट असते, परुंतु खेळाडूंच्या संख्येनुसार याचा आकार बदलता जाऊ शकतो. (Lagori Game Information In Marathi)
खेळाडूंचे कपडे
खेळाडूंना विविध प्रकारचे आरामदायक आणि हलके कपडे घालावेत असतात. कारण खेळात धावण्याची आणि उद्या मारण्याची गरज असल्यामुळे खेळाडूंनी सोईचे बूट घालावेत लागते. (Lagori Game Information In Marathi)
खेळाचे फायदे
- शारीरिक तंदुरुस्ती
- मानसिक विकास
- संघभावना आणि सहकार्य
FAQ
How is Lagori game played?
लगोरी हा खेळ मॅटवर मातीच्या मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे या खेळामध्ये स्ट्रायकर आणि डिफेंडर अशा दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो
How many players are in Lagori?
प्रत्येक संघात 15 खेळाडू असतात ज्यामध्ये 12 खेळाडू मैदानात असतात तर तीन खेळाडू हे पर्यायी खेळाडू म्हणून असतात. 12 खेळाडूंपैकी 6 खेळाडू हे मैदानाच्या आत तर सहा खेळाडू हे बॉण्ड्री लाईनला असतात
READ MORE
1.खो खो खेळाची संपूर्ण माहिती | Kho-Kho sport Information In Marathi
2.कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती Kabaddi Information in Marathi
3.क्रिकेट खेळाची माहिती 2024 Cricket About Information In Marathi 2024
Good information sir, Please explain the rules in example
Thank you