एन.आर. नारायणमूर्ति संपूर्ण माहिती | N. R. Narayana Murthy information in Marathi

N. R. Narayana Murthy information in Marathi | Early Life of Narayan Murthy | Career of Narayan Murthy | Company formation of Infosys | Narayan Murthy

नमस्कार मित्रांनो, आज आपण एका भारतीय अब्जाधीश व्यापारी , भारतीय उद्योजक, सॉफ्टवेर अभियंता व इन्फोसिस टेक्नॉलॉजीज कंपनीचे संस्थापक नागवार रामराव नारायणमूर्ती ऊर्फ एन.आर. नारायणमूर्ती यांचा जीवन परिचय बघणार आहोत.त्यांनी जीवनात केलेला संघर्ष, त्यांचे शैक्षणिक जीवन,  त्यांचे कौटुंबिक जीवन , तसेच एक अभियंता विद्यार्थी ते भारतीय अब्जाधीश बनण्याचा प्रवास हे सर्व आपण आजच्या टॉपिक “N. R. Narayana Murthy information in Marathi” मध्ये बघणार आहोत.

मित्रानो, त्यांचा संघर्ष, त्यांचे जीवन जगण्याचे तत्वे, त्यांचे विचार ह्या गोष्टी आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहेत. तसेच त्यांचा जीवन परिचय वाचून तुमच्या आयुष्याला एक दिशा नक्की  मिळेल.   

नागवार रामराव नारायणमूर्ती म्हणजेच एन.आर. नारायणमूर्ती  हे भारतीय उद्योजक, सॉफ्टवेर अभियंता व भारतीय आयटी कंपनी  इन्फोसिस टेक्नॉलॉजीज चे संस्थापक असून. ते एक भारतीय अब्जाधीश व्यापारी सुद्धा  आहेत. ते इन्फोसिस मधुन निवृत्त होण्यापूर्वी व  अध्यक्षपदी पदभार स्वीकारण्यापूर्वी कंपनीचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आणि इतर बरेच पदे त्यांनी भूषवली आहेत. ऑक्‍टोबर २०२२ पर्यंत, त्यांची  एकूण संपत्ती $४.६ अब्ज इतकी असल्‍याचा एक  अंदाज आहे, ज्यामुळे फोर्ब्सच्‍या मते २०२२ मध्‍ये ते जगातील ६५४ वे सर्वात श्रीमंत व्‍यक्‍ती बनले आहेत.

नारायण मूर्ती यांचा जन्म कर्नाटकातील राज्यातील  शिडलघट्टा येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आपल्या गावात पूर्ण केले. त्यानंतर ते  उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांनी पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, म्हैसूर विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी तसेच  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

इन्फोसिस कंपनीची स्थापना करण्यापूर्वी, नारायण मूर्ती यांनी अहमदाबाद येथे स्थित  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे चीफ सिस्टम प्रोग्रामर म्हणून आणि पुणे येथेल   पटनी कॉम्प्युटर सिस्टम्स मध्ये देखील काम केले आहे. . त्यांनी १९८१ मध्ये इन्फोसिस ची कंपनी सुरूवात  केली आणि १९८१ ते २००२ पर्यंत ते कंपनीचे सीईओ तसेच २००२ ते २०११ पर्यंत ते कंपनी चेरमन होते जून २०१३ मध्ये, मूर्ती यांची कंपनीच्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

फॉर्च्यून मासिकाने नारायण मूर्ती यांची आमच्या काळातील १२ महान उद्योजक या यादी मध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.भारतातील आउटसोर्सिंगमधील योगदानाबद्दल टाईम मॅगझिन तसेच सीएनबीसी अश्या अनेक मासिकांनी  त्यांना  “भारतीय आयटी क्षेत्राचे जनक” म्हणून त्यांचे  वर्णन केले आहे. २००५ साली, नारायण मूर्ती यांनी  स्वित्झर्लंडमधील झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सह-अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे त्याच सोबत त्यांनी खूप सारे मोठं मोठी पदे भूषवली आहेत. नारायण मूर्ती यांना पद्मविभूषण आणि पद्मश्री अश्या अनेक महान पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे.

नारायण मूर्ती यांचे प्रारंभिक जीवन | Early Life of Narayan Murthy

नारायण मुर्ती यांचा जन्म एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिक्षणाच्या महत्वाचे मूल्य शिकवले आणि त्यांनी देखील ते मूल्य आपल्या जीवनात प्रयोग करून शालेय शिक्षणात उत्तम कामगिरी केली. नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी भारताच्या कर्नाटक राज्यातील सिडलघट्टा येथे झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गेले नंतर त्यांनी  १९६७ मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. १९६९ मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर(उत्तर प्रदेश ) येथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

sudha murthy and narayan murthy family
sudha murthy and narayan murthy family
Nameनागवारा रामाराव नारायण मूर्ति
Born20 August 1946 (age 78)
Born Placeसिडलघाटा, म्हैसूर राज्य, ब्रिटिश भारत (सध्याचे कर्नाटक, भारत)
EducationNational Institute of Engineering, Mysuru (BE) , IIT Kanpur (MTech)
Known forइन्फोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष एमेरिटस  (Founder and Chairman Emeritus of Infosys)
Board member ofयुनायटेड नेशन्स फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन
Spouseसुधा मूर्ती (म. 1978)
Childrenअक्षता मूर्ती, रोहन मूर्ती
Relativesऋषी सुनक (जावई) – Rishi Sunak (son-in-law)
श्रीनिवास कुलकर्णी (मेहुणे) – Shrinivas Kulkarni (brother-in-law)
गुरुराज देशपांडे (मेहुणे) – Gururaj Deshpande (brother-in-law)
Awardsपद्मश्री (2000) – Padma Shri (2000)
ऑनररी कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (2007)
लीजन ऑफ ऑनर (2008)
पद्मविभूषण (2008)
N. R. Narayana Murthy information in Marathi

नारायण मूर्ती यांचे करिअर | Career of Narayan Murthy

नारायण मूर्ती यांनी प्रथम आयआयएम अहमदाबाद येथे स्थित एका विद्याशाखेच्या अंतर्गत संशोधन सहयोगी म्हणून काम केले. तेथे त्यांनी भारतातील प्रथम सामायिकरण संगणक प्रणालीवर काम केले. त्यानंतर त्यांनी सॉफ्ट्रोनिक्स नावाची कंपनीची  सुरूवात  केली. मात्र दुर्भाग्याने दीड वर्षानंतर ती कंपनी अयशस्वी झाली आणि बंद पडली. त्यानंतर ते पुण्यातील पटनी कॉम्प्युटर सिस्टीम येथे रुजू झाले.

नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा सॉफ्टवेर व्यावसायिक मित्रांनी  १९८१ मध्ये सुरुवातीच्या भांडवली गुंतवणुकीसह १०,००० रुपये मध्ये  इन्फोसिसची स्थापना केली, जी रक्कम त्यांच्या पत्नी सुधा नारायण  मूर्ती यांनी  त्यांना प्रदान केली होती. नारायण मूर्ती हे  सन १९८१ ते २००२ साली  इन्फोसिसचे कंपनी चे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO  होते आणि त्या नंतर कंपनी चे सह-संस्थापक नंदन नीलेकणी  यांनी तो पदभार सांभाळला इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून त्यांनी भारतातून आयटी सेवा आउटसोर्सिंगसाठी जागतिक वितरण स्पेशल मॉडेल स्पष्ट केले तसेच डिझाइन देखील केले त्या नंतर त्यांनी ते अंमलात आणले. ते २००२ ते २००६ या काळात ते  मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते, त्यानंतर ते कंपनी चे मुख्य मार्गदर्शक देखील बनले. ऑगस्ट २०११ मध्ये, त्यांनी  कंपनीतून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आणि निवृत्त  झाले, त्यानंतर  चेरमन एमेरिटस हे पद त्यांनी स्वीकारले.

नारायण मूर्ती याना एक मुलगा(रोहन मूर्ती) व एक मुलगी(अक्षता मूर्ती) व पत्नी सुधा मूर्ती असा त्यांचा परिवार आहे.

narayan murthy
narayan murthy

नारायण मूर्ती यांचे  वैयक्तिक जीवन | Personal Life of Narayan Murthy

नारायण मूर्ती याना एक मुलगा(रोहन मूर्ती) व एक मुलगी(अक्षता मूर्ती) व पत्नी सुधा मूर्ती असा त्यांचा परिवार आहे सुधा मूर्ती ह्या एक उद्योगपती, शिक्षक, लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत.रोहन मूर्ती जून २०१३ मध्ये, रोहन आपल्या वडिलांचा कार्यकारी सहाय्यक म्हणून इन्फोसिसमध्ये जॉईन  झाला. नंतर जून २०१४ मध्ये त्यांनी इन्फोसिस सोडले.साल २००९ मध्ये, अक्षता मूर्ती यांनी  ऋषी सुनक यांच्याशी लग्न केले, जे नंतर इंग्लंड मध्ये  रिचमंड, यॉर्कशायरचे खासदार आणि नंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि तसेच युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बनले.

इंफोसिसची कंपनीची स्थापना | Company formation of Infosys

नारायण मूर्ती यांनी १९८१ मध्ये आपल्या सहा इतर सहकाऱ्यांसोबत मिळून  इंफोसिस कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला, कंपनीची सुरुवात केवळ १०,००० INR मध्ये झाली होती. मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली, इंफोसिस कंपनीने आयटी सेवा, परामर्श आणि बिजनेस प्रोसेस आउटसोर्सिंगमध्ये आपल्या सेवांचा विस्तार देखील केला.

narayan murthy old Photos
narayan murthy old Photos

नारायण मूर्ती यांचे सामाजिक योगदान | Social contribution of Narayan Murthy

नारायण मूर्ती  तसेच त्यांच्या पत्नी ह्या त्यांच्या व्यावसायिक कर्तृत्वासोबतच त्यांच्या सामाजिक योगदानासाठी देखील प्रसिद्ध आहेत. त्यांनी मिळून अनेक सामाजिक उपक्रम आणि प्रकल्पांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे तसेच खूप मोठे मोठे सामाजिक प्रकल्प देखील त्यांनी राबवलेले आहेत.

१. इन्फोसिस फाउंडेशन

इन्फोसिस फाउंडेशन हे नारायण मूर्ती आणि त्यांच्या धर्मपत्नी सुधा मूर्ती यांनी स्थापन केलेले असून. हे फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला सशक्तिकरण तसेच  कला व संस्कृती अशा अनेक  क्षेत्रात आपले कार्य करते. फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक मोठं मोठ्या शाळा, ग्रंथालये, रुग्णालये आणि इतर सामाजिक सुविधा उभारल्या आहेत.

२. ग्रामीण विकास

नारायण मूर्ती आणि इन्फोसिस फाउंडेशनने सर्व ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अनेक मोठं मोठे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रात विशेष लक्ष केंद्रित केले असून. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक ग्रामीण भागांचे जीवनमान सुधारले असून अजून हि त्यांचे कार्य चालू आहे.

३. शिक्षण

शिक्षणाच्या क्षेत्रात देखील नारायण मूर्ती यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालयांसाठी अनुदान दिले आहे तसेच त्यांच्या दुरुस्ती साठीही त्यानी अनुदान दिले आहे. त्यांच्या फाउंडेशनने अनेक मोठं मोठ्या आणि प्रसिद्ध  शिक्षणसंस्था उभारल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या फाउंडेशनने शिष्यवृत्ती दिल्या आहेत. त्यांनी ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

४. आरोग्य सेवा

नारायण मूर्ती यांनी शिक्षनासोबत आरोग्य सेवांच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी  भागातील आरोग्य सेवांच्या सुविधा सुधारण्यासाठी आणि गरजू लोकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक उपक्रम आणि प्रकल्प राबवले आहेत.

५. महिला सशक्तिकरण

महिला सशक्तिकरणासाठी नारायण मूर्ती यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांनी महिलांसाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकतेसाठी अनेक  कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यांच्या फाउंडेशनने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम चालवत आहे.

नारायण मूर्ती यांनी लिहलेली पुस्तके

नारायण मूर्ती यांनी विविध विषयांवर अनेक प्रसिद्ध  पुस्तके लिहिली असून . त्यांच्या पुस्तकांमधून त्यांनी तंत्रज्ञान, उद्योजकता, आणि समाजसेवा या क्षेत्रातील आपले अनुभव, आपले  विचार मांडले आहेत.

१. “A Better India: A Better World”

या पुस्तकात नारायण मूर्ती यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव आणि विचार मांडले आहेत. त्यांनी भारतीय समाज आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी त्यांच्या दृष्टीकोनाचे वर्णन केले आहे. हे पुस्तक त्यांच्या भाषणांचे आणि निबंधांचे संकलन आहे.

२. “Wit and Wisdom of Narayana Murthy”

या पुस्तकात नारायण मूर्ती यांच्या विविध भाषणांचे आणि लेखांचे संकलन आहे. यातून त्यांनी तंत्रज्ञान, नेतृत्व, व्यवस्थापन, आणि उद्योजकता या विषयांवर आपले विचार मांडले आहेत. त्यांच्या वाक्यांच्या माध्यमातून वाचकांना प्रेरणा मिळते.

३. “Lessons from My Life: In Leading a Successful Organization”

या पुस्तकात नारायण मूर्ती यांनी इंफोसिसच्या स्थापनेपासून ते कंपनीला जागतिक स्तरावर नेण्याच्या प्रवासातील अनुभव आणि शिकवणी मांडली आहे. त्यांनी नेतृत्व, कार्यसंस्कृती, आणि व्यवस्थापनाच्या तत्त्वांची चर्चा केली आहे.

४. “Engineered in India: A Founder’s Journey”

हे पुस्तक त्यांच्या जीवनातील प्रवासाचे आणि त्यांनी इंफोसिसची स्थापना आणि वाढ कशी साधली याचे वर्णन करते. यात त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यांवर आपले विचार मांडले आहेत.

५. “Leadership in Turbulent Times”

या पुस्तकात नारायण मूर्ती यांनी त्यांच्या नेतृत्व कौशल्यांची आणि कठीण काळात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. यातून त्यांनी नेतृत्वाची तत्त्वे आणि यशस्वी संस्थेच्या निर्मितीचे मर्म सांगितले आहे.

नारायण मूर्ती यांच्या पुस्तकांमधून वाचकांना उद्योजकता, नेतृत्व, तंत्रज्ञान आणि समाजसेवा याबद्दल मौल्यवान शिकवणी मिळते. त्यांच्या विचारांनी आणि अनुभवांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे.

नारायण मूर्ती यांच्याकडे एकूण संपत्ती | Net worth of Narayan Murthy

नारायण मूर्ती यांची एकूण संपत्ती सुमारे $4.7 अब्ज असून, जी भारतीय रुपयांमध्ये सुमारे 38,981 कोटी रुपयांच्या आसपास आहे. ते इन्फोसिसचे सहसंस्थापक असून   त्यांची कंपनीत मोठी  हिस्सेदारी आहे. त्यांच्या व्यवसायातील, वैयक्तिक संपत्तीत अनेक गुंतवणूक आणि तसेच नामांकित कंपनी च्या गाड्या याचा देखील त्यांच्या मालमत्तेमध्ये समावेश आहे. 

सन्मान आणि पुरस्कार | Honors and Awards

नारायण मूर्ती यांना त्यांच्या जीवनात अनेक महत्वाचे सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये काही महत्त्वाचे पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत:

Narayan Murthy

पद्म विभूषण – भारत सरकारकडून 2008 मध्ये त्यांना पद्म विभूषण  देण्यात आला आहे.

पद्मश्री – भारत सरकारकडून 2000 साली  त्यांना पद्मश्री देण्यात आला आहे..

Legion of Honour – फ्रान्स सरकारकडून 2008 मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ग्लोबल इंडियन अवॉर्ड – 2003 मध्ये CNN-IBN कडून मिळाला.

नारायण मूर्ती यांना त्यांच्या उद्योजकतेसाठी आणि समाजकार्यासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे

ब्रिटनचे पंतप्रधान आणि नारायण मूर्ती यांच्यात काय नातं | Relationship between British Prime Minister and Narayan Murthy

Narayan Murthy FAMILY

नारायण मूर्ती यांच्या जावयाचे नाव ऋषी सुनक आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. ते भारतीय वंशाचे असून, त्यांचे आई वडील हे  भारतीय आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे आणि त्यांनी गोल्डमन सॅक्समध्ये काम केले आहे. त्यांनी भारतीय सॉफ्टवेअर उद्योजक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्याशी लग्न केले आहे. ऋषी सुनक यांनी ब्रिटिश संसदेत सदस्य म्हणूनही देखील कार्य केले आहे. त्यांनी चान्सलर ऑफ द एक्सचेकर पदावरही काम केले आहे.

FAQ

नारायण मूर्ती इन्फोसिसचे मालक आहेत का?

हो, नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत.  

नारायण मूर्ती यांचा इन्फोसिसमध्ये किती हिस्सा आहे?

नारायण मूर्ती यांच्याकडे इन्फोसिसच्या 1.51 कोटी शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण शेअर्सच्या 0.36 टक्के हिस्सा आहे

मी नारायण मूर्तीशी संपर्क कसा साधू शकतो?

नारायण मूर्ती यांच्याशी संपर्क साधण्यासाठी, आपण त्यांच्या कंपनी इन्फोसिसच्या मुख्यालयाशी संपर्क साधू शकता. इन्फोसिसच्या वेबसाइटवर कंपनीच्या मुख्यालयाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळू शकतो. तसेच, नारायण मूर्ती यांचा वैयक्तिक इमेल किंवा इतर संपर्क माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नसू शकते, म्हणून कंपनीच्या माध्यमातून संपर्क करणे अधिक योग्य ठरेल.

इन्फोसिस भारतात किती कर भरते?

इन्फोसिसने वित्तीय वर्ष 2024 साठी एकूण ₹6,471 कोटींचा कर भरणा केला. हे विविध प्रकारच्या करांमध्ये विभागलेले आहे, ज्यात कॉर्पोरेट टॅक्स, डीव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, आणि इतर करांचा समावेश आहे

नारायण मूर्ती यांनी किती दान केले?

नारायण मूर्ती यांनी त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्यासह विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात दान केले आहे. काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत:
कर्करोग उपचारांसाठी दान: त्यांनी किडवाई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजीला ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी ₹40 कोटी आणि इतर सुविधांसाठी ₹8 कोटी दान केले आहे. तिरुपती मंदिराला दान: नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी तिरुपती बालाजी मंदिरात 2 किलो सोन्याचा शंख आणि कासव दान केले आहे .
ते आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात दान केले आहे. इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा, आणि ग्रामीण विकास कार्यक्रमांसाठीही मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे

नारायण मूर्ती कधी निवृत्त झाले?

नारायण मूर्ती 2011 मध्ये इन्फोसिसच्या कार्यकारी अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले. ते कंपनीचे सह-संस्थापक असून, त्यांनी इन्फोसिसच्या वाढीत आणि यशस्वीतेत महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या निवृत्तीनंतर, त्यांनी कंपनीच्या सल्लागार मंडळावर सेवा दिली आहे.

नारायण मूर्तीचा मुलगा काय करतोय?

नारायण मूर्तीचा मुलगा नाम रोहन मूर्ती आहे. त्याने प्रोग्रामिंग आणि इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्फेरेत काम केले आहे, आणि त्याच्या वडिलांच्या योग्यतेशी त्याने आपल्याला आधुनिक IT क्षेत्रात अग्रगामी कंपनीच्या स्थापना करण्यात मदत केली आहे.

Read More

1.सुनीता विल्यम्स Sunita Williams information in Marathi

2.नीरज चोपड़ा यांची संपूर्ण माहिती Neeraj Chopra Information In Marathi

3.रतन टाटा मराठीत माहिती Ratan Tata information in Marathi

2 thoughts on “एन.आर. नारायणमूर्ति संपूर्ण माहिती | N. R. Narayana Murthy information in Marathi”

Leave a Comment