Swapnil Kusale Paris Olympics मध्ये Bronze जिंकला | Story of Swapnil kusale in marathi

Swapnil Kusale Paris Olympics | Who is Swapnil kusale? – family background | कोल्हापूरचा स्वप्नील इथवर कसा पोहोचला? | Swapnil kusale Shooting career


मित्रांनो…! 2024 ऑलिंपिकमधून (Paris Olympics 2024) नुकतीच भारताला एक सुखद आणि आनंदाची बातमी मिळाली आहे. ती म्हणजे कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) 50 मीटर थ्री पोझिशन शूटिंगमध्ये जिंकलेले ब्रॉंझ मेडल. हा क्षण आणि ही बातमी संपूर्ण देशालाच आनंद देणारी आहे. परंतु त्याहून अधिक आनंद महाराष्ट्राला झाला आहे कारण मागील सात दशकांपासून महाराष्ट्राने एकही ऑलिंपिक पदक जिंकून दिले नव्हते. चला तर मग, स्वप्निल कुसाळे विषयी अधिक जाणून घेऊया या ब्लॉगच्या माध्यमातून (Swapnil Kusale Paris Olympics).

Who is Swapnil kusale? – family background | कोण आहे स्वप्नील कुसळे? – कौटुंबिक पार्श्वभूमी

कोल्हापूरच्या राधानगरी मध्ये कांबळवाडी म्हणून गाव आहे या गावाची लोकवस्ती फक्त बाराशे आहे हेच ते गाव ज्यामध्ये स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) जन्मला आला. हे त्याचे मूळ गाव त्याचे वडील सुरेश कुसाळे हे शिक्षक आहेत तर आई अनिता कुसाळे सरपंच आहेत कांबळवाडी गाव खरंतर सेंद्रिय शेतीसाठी प्रसिद्ध आहे. या गावातील बरीच मुलं हे आपलं शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत असत.

स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) आपले प्राथमिक शिक्षण हे कारखान्याच्या शाळेत पूर्ण केले आणि नंतरचे शिक्षण घेण्यासाठी तो कोल्हापूरच्या भोगावती शाळेतील हॉस्टेलमध्ये राहू लागला. त्या शाळेत फिटनेस वर विशेष लक्ष दिले जात होते आणि त्यामुळे स्वप्निल ला खेळाची गोडी लागली.

स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) या शाळेत शिकत असताना क्रीडा स्पर्धेचा चाचणीत आपल्या क्रीडा कौशल्याने सर्वांनाच दंग केले होते आणि सर्वांचे लक्ष त्याच्याकडे खेचून घेतले होते त्यावेळेसच स्वप्निल कुसळे फक्त 14 वर्षाचा होता आणि या वयातच त्याला आपल्या आयुष्याचे ध्येय मिळाले. ते ध्येय म्हणजे नेमबाजी रायफल शूटिंग.(Swapnil Kusale Paris Olympics)

Swapnil Kusale Paris Olympics मध्ये Bronze जिंकला | Story of Swapnil kusale in marathi

Swapnil kusale Shooting career | स्वप्नील कुसळे नेमबाजी करिअर

स्वप्निल कुसाळेला (Swapnil Kusale) आपलं करिअर नेमबाजी मध्ये पुढे नेण्यासाठी रायफल शूटिंग सेंटर मध्ये प्रवेश घ्यायचा होता. ज्या ठिकाणी तो जाऊन नेमबाजीचे धडे घेऊ शकत होता आणि नेमबाजी शिकवणारी तीन केंद्र होती १.कोल्हापूर २.पुणे & ३.नाशिक.

स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) यांनी नेमबाजी प्रशिक्षण घेण्यासाठी या तीनही नेमबाजी केंद्रात अर्ज भरला होता कोल्हापूर नेमबाजी केंद्र आणि पुणे नेमबाजी केंद्र हे त्याच्या सोयीचे ठरलं असतं पण तो निवडला गेला तो नाशिकच्या नेमबाजी केंद्रात आणि इथूनच त्याच्या प्रवासात आव्हान मिळण्याची सुरुवात झाली.

नाशिक नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात त्याला प्रवेश मिळाल्यानंतर त्याने नाशिक मध्ये मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला एके बाजूला शाळा दुसऱ्या बाजूला प्रशिक्षण असं दोन्हीही स्वप्निल करू लागला होता घरी आल्यानंतर स्वप्निल त्यांच्या आई-वडिलांना नेमबाजीचं कौशल्य दाखवत होता त्यामुळे स्वप्निलच्या घरचे हे त्याचा बरोबर हे नेमबाजीचे स्वप्न हे बघत होते.(Swapnil Kusale Paris Olympics)

स्वप्निल कुसाळे ने ९वी मध्ये असताना आपलं नेमबाजीतल पहिलं राज्यस्तरीय मेडल मिळवलं परंतु एकीकडे नेमबाजी क्षेत्रात झेप घेत असताना स्वप्निल कुसाळे समोर एकेक आव्हाने येऊ लागली ती म्हणजे पैशांची नेमबाजी साठी लागणारी रायफल, जॅकेट, शूज आणि बुलेट आणि इतर गोष्टी. कित्येक खेळाडू खेळ फक्त याच्यासाठी सोडतात की त्यामध्ये बऱ्याच खर्च होत असतो स्वप्निल रायफल चा बुलेट लागत असत ज्या 120 रुपयाच्या होत्या.

परंतु स्वप्निल कुसाळे यांचे वडील सुरेश कुसाळे यांचा भक्कम पाठिंबा होता. सुरेश कुसाळे यांनी आपल्या मुलाचे नेमबाजीतले प्रशिक्षण चालू ठेवण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे कर्ज काढून आपल्या मुलाचे प्रशिक्षण चालू ठेवण्याचा. त्यांनी कर्ज काढून प्रशिक्षण हे चालू तर ठेवलेच आणि याची जाणीव स्वप्निल कुसाळे यालाही होती.

वडिलांच्या तळमळीची जाणीव स्वप्निल कुसाळे ला होतीच आणि ही त्यानेही दाखवून दिले ते यातून की तो प्रत्येक बुलेट ही जपून वापरायचा आणि याची सवय त्याला इथूनच लागली आणि त्याचबरोबर स्वप्निल कुसाळे याची जिंकण्याची जिद्द आणि प्रशिक्षणाची धडपड थांबली नाही. 2013 पर्यंत स्वप्निल ना त्याचं नाव हे देशभरात चमकवलं होतं आणि त्यामुळे त्याच्या नेमबाजीचा खर्च पूर्ण व्हावा यासाठी लक्ष नावाची संस्था ही त्याच्या पाठीमागे उभी राहिली.

Swapnil Kusale Paris Olympics मध्ये Bronze जिंकला | Story of Swapnil kusale in marathi

स्वप्निल कुसाळे साठी 2015 हे वर्ष खूप महत्त्वाचा ठरला त्याने ऑलिंपिक पदक विजेता गगन नारंगला या स्पर्धेत हरवल आणि नॅशनल गोल्ड मेडल आपल्या नावे केल होत. या स्पर्धेनंतर स्वप्निल कुसळल्याने एशियन चॅम्पियन मध्ये गोल्ड मेडल मिळवलं तो एशिया मधला बेस्ट नेमबाज ठरला त्याच्या या घवघवीत यशा नंतर पुणे रेल्वे स्टेशन ने त्याला तिकीट कलेक्टरची नोकरी ऑफर केली आणि ती त्याने स्वीकारली. घरचा पाठिंबा, भारतीय रेल्वेमध्ये मिळालेली नोकरी आणि लक्ष सारख्या संस्थेचं पाठिंबा हे सर्व मिळून स्वप्निल यशाच्या शिखरावर पोहोचला होता परंतु त्याला अजून पुढे बरीच लढाई लढायची होती. कॉमनवेल चॅम्पियनशिपमध्ये स्वप्निल ने ब्रॉंझ मेडल मिळवलं होतं. त्यानंतर त्याला एक रायफल घ्यायची होती जी जवळपास नऊ लाखाची होती ही रायफल स्वप्नीलने त्याच्या सेविंग आणि वडिलांच्या मिळालेल्या सपोर्ट ने घेतली.

स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक पदक प्रवास | Swapnil Kusale’s Olympic Medal Journey

स्वप्निल कुसाळे समोर नवीन नवीन आव्हान समोर येत होती आणि तो उत्तमरीत्या हाताळून त्यांना मोडूनही काढत होता आणि यशाचे शिखर चढत होता त्याला नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड त्यानंतर झालेल्या 2022 वर्ल्ड कप मध्ये थोडक्यात हुकलेलं पदक यामुळे त्यांनी 2024 च्या पॅरिस ऑलम्पिक ची जागा ही पक्की केली होती. स्वप्नील कुसाळे दहा मीटर रायफल शूटिंग ची प्रॅक्टिस करत होता मात्र त्याची ओढ ही 50 मीटर थ्री पोझिशन रायफल शूटिंग कडे होती. स्वप्निल कुसाळे 50 मीटर थ्री पोझिशन रायफल शूटिंगची ओढ ही त्याच्या कोच दिपाली देशपांडे यांनी ओळखले होते त्यात त्याची झोपून शूट करण्याचं कौशल्य हे भारी होतं त्यामुळे स्वप्निल ला कोच ने त्याला थ्री पोझिशन फिफ्टी मीटर रायफल शूटिंग करण्यासाठी सल्ला दिला त्यानंतर तो त्यात यशही मिळवत गेला.

स्वप्निल कुसाळे पॅरिस ऑलिंपिक पर्यंत पोहोचला पण त्यानंतर त्याला एका नवीन आव्हानाला समोर जावं लागला. फिफ्टी मीटर थ्री पोझिशन रायफल शूटिंग मध्ये शूटर्स तीन पोझिशनमध्ये शूट करावा लागतो – पहिलं म्हणजे निलिंग – गुडघ्यावर बसून, दुसरं म्हणजे स्टॅंडिंग – उभा राहून, तिसरं म्हणजे प्रोन – झोपून.

स्वप्निल कुसाळे प्रोन पोझिशन शूट करण्यात चांगला तर होताच त्याला निलिंगही चांगल्या प्रकारे जमत होत परंतु त्याला स्टॅंडिंगला शूट करताना एका नवीनच आव्हानाला समोर जावं लागलं अगदी नॅशनल खेळ खेळताना असताना हि , त्याला स्टॅंडिंग पोझिशनमध्ये कधी ताप यायचा कधी त्याचा अंग दुखायचं तर त्याला अशक्तपणा जाणवायचा घसा दुखायचा आणि याचा परिणाम असा व्हायचा की त्याची जी एकाग्रता आहे हि भंग होत होती आणि अशा खेळात एकाग्रता हे खूप महत्त्वाची असते.

पॅरिस ऑलम्पिक अगदी तोंडावर असताना स्वप्निल समोर उभे राहिलेले हे नवीन आव्हान त्याच्या मेहनतीवर पाणी फिरवून टाकण्यासारखं होतं, डिसेंबर २०२३ ला स्वप्निल एका चाचणीत कळालं कि त्याला लॅक्टोस इंटॉलरन्स आहे म्हणजे दूध दुग्धजन्य पदार्थ यांचं सेवन केलं तर त्याला त्रास होत होता त्यामुळे त्याने दूध आणि दुधापासून बनलेल्या पदार्थ पासून स्वतःला लांबच ठेवलं आणि पॅरिस ऑलम्पिक ची तयारी करू लागला.

फिफ्टी मीटर थ्री पोझिशन शूटिंगच्या या खेळामध्ये प्रोन, निलिंग & स्टॅंडिंग पोझिशनमध्ये शूटर्स शूट करावा लागतो. प्रत्येक शूटर्स ला 40 शॉट्स मिळतात ही पात्रता फेरी असते. यात जे पहिले आठ शूटर्स येतात ते मेडल राऊंडसाठी क्वालिफाय होता. या क्वालिफायर राऊंड मध्ये स्वप्निल ने 590 पॉईंट्स घेऊन सातव्या नंबरशची पोझिशन राखली होती.

स्वप्निल मेडल राऊंड साठी क्वालिफाय झाल्यानंतर मेडल राऊंड मध्ये पहिल्या तीन राउंड नंतर स्वप्निल चौथ्या क्रमांकावर होता यात असं वाटत की स्वप्निल 0.5 पेक्षा कमी फरकाने आपलं मेडल पासून वंचित राहतो की काय, एलिमिनेशन राऊंड मध्ये सुरुवातीचे दोन शूटर्स बाहेर जातात मग प्रत्येक शहॉंटेर्स एक एक शॉट्स नंतर बाहेर पडतो यात सगळे शॉट्स हे स्टँडिंग घ्यायचे असतात आणि स्वप्नील मागच्या एका वर्षाच्या अगोदर या स्टँडिंग शॉट ला कमी पडत होता परंतु स्वप्नीलने त्याने 10.5, 9.4, 9.9, 10.0 असे शॉट घेत पॅरिस ओलंपिक मध्ये तीन नंबरची पोझिशन राखून ब्रॉंझ मेडल हे भारताला जिंकून दिले.(Swapnil Kusale Paris Olympics)

Swapnil Kusale Paris Olympics मध्ये Bronze जिंकला | Story of Swapnil kusale in marathi

Read More

1.Manu Bhaker Information in Marathi : Olympic medal Winner | मनु भाकर मराठीत माहिती: ऑलिम्पिक पदक विजेता

2.लगोरी खेळाची माहिती | Lagori Game Information In Marathi

3.रिंकू सिंग फॅमिली लाइफ स्टोरी आयपीएल करिअर | Rinku Singh Life Story Farsh se Arsh Tak

Leave a Comment