डिजिलॉकर संपूर्ण माहिती मराठीत | DigiLocker Information In Marathi

Digilocker information in Marathi | What is Digilocker in marathi | What is DigiLocker Benefits | Sign Up for DigiLocker

आपण डिजिलॉकर या टॉपिक बद्दल लेख बघणार आहोत. डिजिलॉकर बद्दल संपूर्ण माहिती मराठी, डिजीलॉकर म्हणजे काय?  डिजिलॉकर 100% सुरक्षित आहे का? digilocker app details ही संपूर्ण माहिती बघणार आहोत.

भारत सरकार डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत आपल्या नागरिकांना विविध प्रकारच्या योजना लागू करत असतात. त्यासाठी विविध प्रकारच्या डॉक्युमेंट किंवा कागदपत्रांची आवश्यकता असते. म्हणून भारत सरकारने डिजिटल लॉकर मोबाइल अँप तसेच वेबसाईट तयार केली आहे. त्या डिजिटल लॉकर मध्ये  प्रत्येक नागरिक त्यांचे डॉक्युमेंट तसेच पर्सनल डॉक्युमेंट अपलोड करता येईल अशी व्यवस्था केली गेली आहे; पण डिजिलॉकर मध्ये  डॉक्युमेंट अपलोड करताना त्या डॉक्युमेंटची पुरेशी माहिती आपल्या कडे असणे आवश्यक असते. उदा. डॉक्युमेंट नंबर , डॉक्युमेंटवरचे स्पेशीअल नंबर, डॉक्युमेंटवरचे नाव इत्यादी.  DigiLocker Information In Marathi

मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की , डिजिटल लॉकर म्हणजे काय ? डिजिलॉकरचा मराठीत अर्थ काय ? डिजिलॉकर कसे वापरावे ? डिजीलॉकरसाठी साइन अप कशे करावे ? डिजीलॉकरवर कागदपत्रे कशी अपलोड करायची? डिजिलॉकर मोफत आहे का? डिजिलॉकर सुरक्षित आहे का? डिजिलॉकर कसे डाउनलोड करावे? डिजिलॉकर साठी काय काय बाबी आवश्यक आहे? इत्यादी.  

या लेख मध्ये  डिजिटल लॉकरबद्दल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. तसेच तुमच्या सर्व शंकांचे निरसन हि होणार आहे. त्या साठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडल्यास आपल्या ब्लॉगला परत भेट द्या. 

डिजीलॉकर म्हणजे काय? | What Is DigiLocker

सर्वात प्रथम डिजिटल लॉकरलाच शॉर्टफॉर्म मध्ये डिजिलॉकर असे म्हटले जाते.त्यामुळे डिजिटल लॉकर आणि डिजिलॉकर यामध्ये गोंधळून जाऊ नका. डिजिलॉकर हि एका प्रकारची ऑनलाईन सिस्टीम आहे.यामध्ये आपण आपले स्वतःचे डॉक्युमेंट अपलोड किंवा डिजिटल स्वरूपात जतन (स्टोरेज) करू शकतो. उदाहरण १०वि , १२ वि मार्कशीट, डिप्लोमा मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, नॅशनल सर्टिफिकेट, ड्रायविंग लाइसिस, आधार कार्ड, मतदान कार्ड  इतर कागदपत्रे. 

भारत सरकार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयने  (Electronics and Information Technology) (MeitY) डिजिटलायझेशन ऑनलाईन हि सेवा सुरु केली आहे. डिजिटल लॉकरचा वापर  तुम्ही तुमचा मोबाईल मध्ये किंवा  कॉम्पुटरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. डिजिलॉकर मध्ये अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट हे वैध समजले जातात. त्यामुळे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन फिरण्याची गरज नसते.

डिजिलॉकरचा मराठीत अर्थ | DigiLocker Meaning In Marathi

डीजीलॉकरला आपण एक डिजिटल तिजोरीही म्हणू शकतो.ज्यात आपण आपले सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट जतन शकतो किंवा सुरक्षित ठेवू शकतो.ही प्रणाली बँकेमधील लॉकरच्या प्रमाणे काम करते.जसे आपण बॅंकमध्ये आपल्या महत्वाच्या वस्तू पैसे,दागिने,सोने,चांदी लॉकर मध्ये ठेवतो.तसेच डीजीलॉकर मध्ये आपण आपले सर्व महत्त्वाचे कागद जतन करून ठेवू शकतो.

डिजीलॉकरचे वैशिष्ट्य काय आहे? । What is the feature of DigiLocker?

  1. भारत सरकारने डिजिलॉकर हि प्रणाली ऑनलाईन प्रदान केली आहे आणि हि अगदी  मोफत आहे. 
  2. डिजिटल लॉकर मध्ये  त्तुम्ही तुमचे कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्रे व इतर कागदपत्रे  ऑनलाईन १GB पर्यंत जतन करू शकतात.
  3. डिजिटल लॉकर हे पूर्णपणे सुरक्षित आहे कारण हि प्रणाली भारताने स्वतः तयार केली  आहे. 

DigiLocker चा मालक कोण आहे? | Who is Owner of DigiLocker?

डीजीलॉकरची मालकी सध्या भारत सरकारकडे आहे.भारत सरकारच्या “डिजिटल इंडिया” या उपक्रमाचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये “डिजिलॉकर” हि सेवा सुरू केली. DigiLocker ही एक सुरक्षित, ऑनलाइन दस्तऐवज साठवण्याची सुविधा आहे. जी कागदविरहित प्रशासन साध्य करण्याच्या उद्देशाने सरकारद्वारे चालवली जाते.

डिजीलॉकर फायदे | What is DigiLocker Benefits

  1. डिजिलॉकर मध्ये अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट हे वैध समजले जातात. त्यामुळे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन फिरण्याची गरज नसते.
  2. तुमचे सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अपलोड करू शकता.
  3. वाहनांचे लायसन्स,त्यांचे आरसी बुक,त्यांचा विमा इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही.तुम्ही हे डॉक्युमेंट पोलिसांना तूमच्या डिजिलॉकरमधून दाखवले तरी ते वैध समजले जाता.
  4. डिजिटल लॉकर हे पूर्णपणे सुरक्षित आहे

डिजीलॉकरसाठी साइन अप करा. | Sign Up for DigiLocker

1.तुमच्याकडे मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वर digitallocker या वेबसाईट ओपन करा. (नोट  :- तुम्ही तुमचा मोबाइल मध्ये प्ले स्टोरअर वरून digitallocker हे अँप इन्स्टॉल करू शकतात. )

2. पुढे, वेबसाइट ओपन झाल्यावर, तुम्हाला वरील  साइन अप (sign up) वर क्लिक करा. साइन अप म्हणजे नवीन डिजिटल लॉकर अकाउंट तयार करणे. 

3. पुढे, मग तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म भरायचा त्या फॉर्म मध्ये तुम्हाला स्वतःचे पूर्ण नाव, जन्म तारीख, मोबाइल नंबर (आधार कार्ड ला जॉईन केलेले मोबाईल नंबर टाका.), इमेल आणि पिन टाका (पिन कोड म्हणजे पासवर्ड तुम्हाला ६ अंकी नंबर पासवर्ड सेट करा.) हे भरून आणि समिट (sumit ) या बटणावर क्लिक करा.


4.पुढे, तुमचा आधार कार्ड ( आधार नंबर १२ अंकी नंबर असतो.)  नंबर टाका. नंतर एंटर करा. मग तुम्हाला दोन पर्याय येईल. एक आहे वन टाइम पासवर्ड (One Time Password -OTP) आणि दुसरा आहे. फिंगरप्रिंट. (नोट :- तुम्ही स्वतः अकाउंट ओपन करत आहात. तर OTP हा पर्याय निवडावा ). मंग तुम्ही पुढे जाऊन शकतात. 

5. तुमचा मोबाइल मध्ये आणि ईमेल मध्ये एक मेसेज येईल त्यामध्ये डिजिटल लॉकर अकाउंट तयार झाले आहे. आणि त्या मध्ये मॅसेज मध्ये तुमचा id आणि पासवर्ड येईल. 

6. परत डिजिटल लॉकर वेबसाईट ओपन करा. आता तुम्हाला साइन इन (sign in ) वर क्लिक करा. आणि एक लॉगिन फॉर्म ओपन होईल. तामध्ये तुम्हाला तीन पर्याय येईल. एक आहे. मोबाईल नंबर , दुसरा आहे username आणि तिसरा आहे तुमचा आधार कार्ड चा नंबर टाका. मग तुम्हा खालील नेक्स्ट (next ) बटणावर क्लिक करा.   

अशा प्रकार डिजीलॉकरसाठी साइन अप प्रोसेस आहे. 

डिजिलॉकर कसे वापरावे | How to Use DigiLocker 

  1. वरील प्रमाणे तुमचे डिजिटल लॉकर खाते ओपन झाले आहे. तर तुम्ही तुमचे Id आणि पासवर्ड टाकू लॉगिन इन करू शकतात. 
  2. मग तुमचे डिजिटल लॉकर मध्ये १०वि आणि १२ वि मार्कशीट, आधार कार्ड, मतदान कार्ड, डायव्हिंग लायसन्स आणि इतर बरेच काही यासारखा विविध प्रकारच्या कागद पत्रे सेव्ह किंवा साठवू शकतात.

डिजीलॉकर पिन विसरलात | Forgot DigiLocker Pin

बरेच वेळा तुम्ही तुमचा डिजिलॉकर चा पासवर्ड किंवा पिन विसरला जातो. मग काळजी करू नका । कारण डिजिटल लॉकर मध्ये एक पर्याय असतो. ते पाहूया आणि तुम्ही सहज पणे तुमचा पासवर्ड रीसेट करू शकतात.  

१. नेहमी प्रमाणे DigiLocker या वेबसाईवर जा (digitallocker.gov.in). 

२. वरील तुम्हाला एक साइन इन (sign in) वर क्लिक करा. 

३. तुम्हाला username वर क्लिक करा. आणि खालील तुम्हा “Forget security PIN” या शब्दाला क्लिक करा. 

४. मग तुमचा आधार कार्ड नंबर किंवा मोबाइल (तुम्ही दिलेल्या डिजिटल लॉकर वेबसाइट ला sumit केला आहे तो टाका. )

५. मग खालील “next” हा बटला क्लिक करा. आणि तुमचा मोबाइलवर एक OTP येईल. तो otp टाकून पुढे जा आणि

 ६. तुम्हाला तुमचा  एक पेज ओपन होईल. आणि तुम्हाला ६ अंकी नंबर टाकून sumit करा. 

७. आता नवीन लॉगिन करू पाहू शकतात. कि पासवर्ड बरोबर सेट केला आहे कि नाही. 

नोट :- दर तीन महिना नंतर पासवर्ड बदल करत जा.

डिजीलॉकरवर कागदपत्रे कशी अपलोड करायची | How to Upload Documents on DigiLocker

  1. digital लॉकर हा खाते साइन इन करा: तुमच्या मोबाइलdigital लॉकर हा खाते डिव्हाइसवर DigiLocker लॉगिन करा. 
  2. खाते ओपन झाल्यावर तुम्हाला वरील एक मेनू बटणावर क्लिक करा. (वरती डावीकडे बर्गर मेनू (तीन आडव्या रेषा) वर टॅप करा.)
  3. तिथे एक पर्याय येईल तो म्हणजे अपलोड दस्तऐवज (upload document ) या पर्याया क्लिक करा.  
  4. मग तुम्ही तुमचा फाईल प्रवेश करण्याची अनुमती द्या.
  5. मग तुमचा पद्धत नुसार कागद पत्रे  अपलोड करा. 

डिजीलॉकर वरून डॉक्युमेंट कसे हटवायचे | How to Delete Document From DigiLocker

  1. DigiLocker ॲप उघडा आणि तुमच्या खात्यात साइन इन करा.
  2. तुम्हाला हटवायचे असलेले डॉकुमेंट्स  निवडा.
  3. पेजच्या  सर्वात खाली , तुम्हाला “delete” पर्याय दिसेल.
  4. तुमच्या खात्यातून निवडक डॉकुमेंट्स काढण्यासाठी त्यावर क्लिक करा.

डिजीलॉकर खाते हटवा Delete DigiLocker Account

डिजिलॉकर खाते हटवणे विशिष्ट पद्धतींद्वारे केले जाऊ शकते:

१. मेलद्वारे डिजिलॉकर हटवा:

तुमच्या Gmail खात्यात लॉग इन करा.

अधिकृत DigiLocker ई-मेल आयडीवर ईमेल तयार करा: support@digitallocker.gov.in.

विषय ओळीत, लिहा: “डिजिटल लॉकर खाते हटविण्याची विनंती.”

ईमेलच्या मुख्य भागामध्ये, तुम्हाला तुमचे DigiLocker खाते का हटवायचे आहे ते स्पष्ट करा. 

ईमेल पाठवा आणि पुष्टीकरणाची प्रतीक्षा करा.

२. सपोर्ट सेंटरद्वारे डिजिलॉकर हटवा:

DigiLocker वेबसाइटला भेट द्या.

खाली स्क्रोल करा आणि “संपर्क” पर्याय शोधा.

समर्थन कार्यसंघाशी संपर्क साधा आणि खाते हटवण्याची विनंती करा.

डिजिलॉकर समर्थन | DigiLocker Support

support@digitallocker.gov.in.

डिजीलॉकर टोल फ्री नंबर | DigiLocker Toll Free Number

 +91-11-24303-714.

FAQDigiLocker Information In Marathi

डिजिलॉकर मोफत आहे का?

होय

डिजिलॉकर भारतात कायदेशीर आहे का?

होय

डिजिलॉकर मार्कशीट वैध आहे का?

होय

Read More

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनचा What is End to End Encryption in Marathi

UPI चा मराठीत अर्थ काय आहे? UPI Meaning In Marathi

Leave a Comment