खो खो खेळाची संपूर्ण माहिती | Kho-Kho sport Information In Marathi

Kho Kho Game History | Meaning of Kho-Kho | How to Play Kho Kho | Kho kho ground | Kho kho rules | Kho-Kho sport Information In Marathi

नमस्कार मित्रानो, हा ब्लॉग लिहण्यासाठी मी खूप आतुर होतो का ते तुम्ही या ब्लॉग चा नावा वरून अंदाज लावूच शकता, हो मी पण एक खो-खो खेळाडू आहे, मी माझा शालेय जीवनात खो-खो या खेळात जिल्हा, विभाग या स्तरा पर्यंत आमचा संघाने मजल मारली, मला माझा शालये जीवनात मैदानी खेळ खेळल्या खूप आवडत होते, मी पाळण्याचा शर्यतीत १०० मीटर, २०० मीटर, उंच उडी & हर्डल्स १०० मीटर अशे विविध खेळ खेळले आहेत आणि त्या मध्ये पदके हि जिंकली आहेत.

आणि आज या ब्लॉग चा माध्यमातून मी तुमचा समोर माझा अत्यंत प्रिय खेळ खो-खो या विषय माहिती घेऊन येत आहे आणि हा ब्लॉग खो-खो खेलाडूला नक्कीच आवडेल हि आशा.. चला तर मग जाणून घेऊ या…!

खो खो खेळाची संपूर्ण माहिती | Kho-Kho sport Information In Marathi

खो-खो खेळाचा इतिहास | Kho Kho Game History In Marathi

तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल की खो-खो हा खेळ खूप जुना आहे आणि प्राचीन आहे खो-खो हा खेळाची ची उत्पत्ती आणि हा खेळ कधी अस्तित्वाला हे सांगता येऊ शकत नाही. पण खेळाचा उल्लेख प्राचीन महाभारत महाकाव्यात चक्रव्यू घटनेत अचूकपणे केला गेला आहे. महाभारत युद्ध हे 18 दिवस पांडू पुत्र आणि कौरव मध्ये चालले युद्धाच्या तेराव्या दिवशी कौरव आणि पांडू गुरु जे या युद्धात कौरवांकडून युद्ध लढत होते त्यांनी एक अनोखी रणनीती चक्रव्यू आखली जी अशी होती की जी पांडू पुत्रांना भंग करणे अशक्य होती त्याला अर्जुन पुत्र अभिमन्यू या एकमेव युद्धाने भेदले होते परंतु तो या ठिकाणी वीरगतीला प्राप्त झाला त्या योद्धाची लढाईची शैली ही रिंग प्ले ची संकल्पना प्रतिबिंबित करते.

खो-खो चा अर्थ | Meaning of Kho-Kho in Marathi

हा शब्द तेव्हा वापरला जातो ज्यावेळेस आपण मैदानात खेळाडू पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करतो आणि ते करताना आपल्या संघातल्या खाली बसलेल्या खेळाडूला पाठलाग करत असल्या खेळाडूला पकडण्यासाठी ची जबाबदारी सोपवतो त्यावेळेस “खो” शब्द वापरला जातो. खाली बसलेले व्यक्तीला आपली जबाबदारी सोपवण्यासाठी खो या शब्दाचा प्रयोग केला जातो.

खालील बसलेली व्यक्ती “खो” म्हटल्याशिवाय समोरच्या खेळाडूचा पाठलाग करू शकत नाही.

खो-खो खेळ कसा खेळला जातो ? | How to Play Kho Kho in Marathi

ज्या खेळाडूंचं खो खो वर प्रेम आहे अथवा जे खेळाडू हा खेळ खेळतात त्यांना तर माहीतच असेल की खो-खो खेळा हा किती लोकांमध्ये खेळला जातो किती लोक मैदानात असतात किती लोक राखीव असतात त्यांची खेळण्याची पद्धत काय काय असते हे त्यांना माहीतच असेल तर चला तर जाणून घेऊया सविस्तर की हा खेळ नक्की खेळला जातो

खो-खो साठी आवश्यक खेळाडू संख्या | Players in Kho Kho Marathi

खो खो या खेळामध्ये दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी नऊ खेळाडू असतात आणि तीन राखीव खेळाडू असतात. दोन्ही संघाचे नऊ खेळाडू हे मैदानात खेळत असतात त्यापैकी एक संघ जो आपले नऊ खेळाडू मैदानात, समोरच्या संघाच्या तीन खेळाडूंचा पाठला करत असतो पाठपुरावा करत असतो. जे तीन खेळत असतात आणि त्यांचा जो संघ पाठलाग करत असतो त्यांना पकडत असतो.

खो-खो साठीचा वेळ | Kho Kho Game Time in Marathi

राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खो खो खेळण्यासाठी नऊ मिनिटे मिळतात या खेळात प्रत्येक संघाला आणि संघांना जिंकण्यासाठी दोन डाव असतात.

सांगायचं झालं तर समजा ए आणि बी संघाची स्पर्धा आहे जर ए संघ पहिल्या डावात बी संघाचा पाठपुरावा करत असेल तर पहिल्या डावात त्याने बी संघाचे किती खेळाडू बाद केले आणि किती गुण अर्जित केले असतील तर बी संघ त्याच डावात ए संघाचा पाठपुरा करून ते गुण आणि बरोबरी करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर सुरु होतो दुसरा डाव, आणि यामध्ये ही पहिल्या डावा इतकाच वेळ मिळवतो आणि दोघा डावा मिळून ज्या संघाचे सर्वात जास्त गुण असतील तो संघ विजय घोषित केला जातो

खो-खो खेळाचे मैदान माहिती मराठी | Kho Kho ground measurement information in Marathi

साधारणपणे मैदानाची लांबी 25 ते 27 मीटर असते व मैदानाची रुंदी 13 ते 15 मीटर असते मैदानातील लांबीच्या बाजूच्या रेषेला बाजू रेषा व रुंदीच्या बाजूच्या रेषांना अंतिम रेषा म्हणतात. (Kho-Kho sport Information In Marathi)

अंतिम रेषेपासून 2.70 मीटर मैदानाच्या आत दोन्ही बाजूंना दोन खांब लावलेले असतात मध्य रेषेची लांबी साधारणपणे 22.7 मीटर असते मध्यरेषेवर आठ क्रॉस रेषा असतात ज्यामध्ये आठ खेळाडू खेळ खेळण्यासाठी बसतात आणि एक खेळाडू दुसऱ्या संघाच्या खेळाडूंचा पाठपुरावा पाठलाग करत असतो व पकडण्यासाठी पळत असतो खो-खो च्या मैदानात दोन खांबातील अंतर साधारणपणे 18 मीटर असते व खांबाची उंची ही १ मीटर असते.

खो खो खेळाची संपूर्ण माहिती | Kho-Kho sport Information In Marathi

खो-खो नियम | Kho Kho Game Rules In Marathi

खो-खो चा सामना सुरुवात होण्याआधी पंच दोघी संघाच्या कर्णधाराला मैदानात बोलवतात नाणेफेक करून जो संघ नाणेफेक जिंकेल त्या संघाला पळती किंवा पाठलाग करण्याची निवड करायला सांगतात निवड केल्यानंतर पाठलाग करणारा संघाचे चे आठ खेळाडू हे क्रॉस लाईनच्या आठ बॉक्समध्ये जाऊन बसतात आणि एक खेळाडू फ्रिज झोन मध्ये लावलेल्या खांबापासून खेळाची सुरुवात करतो.

पाठलाग करत असलेल्या खेळाडू ने दुसऱ्या खेळाडूला “खो ” हा शब्द स्पष्टपणे उच्चारणे बंधनकारक आहे. तसेच पाठलाग करणाऱ्या खेळाडूची हालचाल प्रतिबंधित आहे पाठलाग करणारा खेळाडू हा फक्त त्या दिशेने धावू शकतो ज्या दिशेने तो पहिलं पाऊल टाकतो त्याला दिशानिर्देश देखील म्हणतात.

तसेच पाठलाग करणाऱ्या खेळाडूची हालचाल प्रतिबंधित आहे पाठलाग करणारा खेळाडू हा फक्त त्या दिशेने धावू शकतो ज्या दिशेने तो पहिलं पाऊल टाकतो त्याला दिशानिर्देश देखील म्हणतात. पाठलाग करणारा खेळाडू हा एकाच दिशेने धावू शकतो त्याचबरोबर जर त्याला मध्य रेषेच्या बाजूला जायचं असेल तर त्याला फ्रीजून आणि खांबाला स्पर्श करून जावे लागते त्यामुळे हा खेळ आव्हानात्मक बनतो.

या खेळामध्ये पाठलाग करणारा खेळाडू क्रॉस लाईन मध्ये बसलेल्या खेळाडूला हात लावून स्पष्ट पणे खो देतो त्यावेळेस क्रॉस लाईन मध्ये बसलेला खेळाडू सक्रिय होतो आणि खो देणारा खेळाडू निष्क्रिय होऊन क्रॉस लाईन मध्ये पुन्हा बसतो.

पाठलाग करणारा संघ बचाव करणाऱ्या संघाच्या तुकडीला ज्यामध्ये तीन खेळाडू असतात पूर्णपणे बाद करतो तेव्हा बचाव करणाऱ्याची संघाची दुसरी तुकडी यामध्ये तीन खेळाडू असतात ते मैदानात येतात. बचाव करणाऱ्या संघाच्या तीन तुकडे असतात ज्यामध्ये कम्प्लीट नऊ खेळाडू खेळत असतात प्रत्येक तुकडी मध्ये ३ खेळाडू असतात जे क्रमाक्रमाने मैदानात येतात.

फुटबॉलप्रमाणेच खो खो मध्येही पिवळे आणि लाल कार्डच्या संकल्पना अस्तित्वात आहेत.

पिवळे कार्ड ही पहिली खबरदारी आहे आणि सामन्यातील दोन पिवळे कार्ड म्हणजे खेळाडूला उर्वरित सामन्यात आणि विशिष्ट स्पर्धेच्या पुढील सामन्यात बसणे आवश्यक आहे.

टूर्नामेंटच्या वेगवेगळ्या सामन्यांमध्ये जमा झालेली दोन पिवळी कार्डे खेळाडूला पुढचा सामना चुकवण्यास भाग पाडतील. दरम्यान, थेट लाल कार्डामुळे, चालू असलेल्या सामन्यातून आणि स्पर्धेच्या पुढील सामन्यातून निलंबन केले जाते.

खो-खो खेळण्यासाठी ट्रिकस | Tricks to play kho-kho

खो-खो हा खेळ दोन पद्धतीने खेळला जातोच यामध्ये एक आहे अटॅकिंग मोड आणि डिफेन्सिव्ह मोड.

हे ट्रिक्स जे तीन खेळाडू नऊ खेळाडू पासून वाचण्यासाठी पडत असतात त्यांच्यासाठी आहे

सिंगल चैन रन | Single chain run

सिंगल चैन रन म्हणजे पळतीवर असलेले खेळाडू हे खाली बसलेल्या आठ खेळाडू आणि त्यांच्या मागोवा करणारा एक खेळाडू अशा नऊ खेळाडू पासून एका पूल पासून ते दुसऱ्या पोल पर्यंत खाली बसल्या आठ खेळांमध्ये झिग झाग पद्धतीने पळतो. सिंगल रनचेस या पद्धतीमध्ये आपण मागवा करत असलेल्या नऊ खेळाडूंना पळती वर असलेला खेळाडू ही खेळी परत परत खेळून थकवतो ज्यामध्ये इतर दोन खेळाडूंना पकडण्यासाठीची ऊर्जा त्यांचा मध्ये उरत नाही. (Kho-Kho sport Information In Marathi)

खो खो खेळाची संपूर्ण माहिती | Kho-Kho sport Information In Marathi

थ्री-थ्री चैन रन | Three-three chain run

खाली बसलेल्या आठ खेळाडू , एका पोल पासून तिसऱ्या नंबर वर बसलेल्या खेळाडूच्या पाठीमागून पळतीवर असलेला खेळ बाहेर पडतो, तो थेट सहाव्या नंबर वर खेळाडूच्या पाठीमागून निघून दुसऱ्या पोल पोचतो याला थ्री थ्री रन चेस असे म्हणतात. या रन चेसचे उद्देशही सिंगल रन चे सारखेच आहे ज्यामध्ये बसलेल्या आठ खेळाडू आणि मागोवा करणारा एक खेळाडू यांना थकवण्याची आहे जेणे करून मागोवा करणाऱ्या संघाचा गुण हे वाढू न देणे आहे.

खो खो खेळाची संपूर्ण माहिती | Kho-Kho sport Information In Marathi

खो-खो खेळाचे फायदे मराठी | Benefits of Playing Kho Kho In Marathi

खो खो खेळ हा एक मैदानी खेळ असून तो सध्या भारतात खूपच लोकप्रिय ठरत आहे. आधी खेळ हा मातीच्या मैदानावरती खेळला जायचा पण तो आता आपण टीव्हीवर कबड्डी प्रमाणेच मॅटवर खेळताना दिसून येत आहे. ज्यामध्ये खेळाडूंना लागू नये याची दक्षता बाळगली जाते.

खो खो खेळ हा चातुर्य, बुद्धिमत्ता आणि शारीरिक याचा संगम आपल्याला या खेळामध्ये बघायला मिळतो.

खेळ नुसताच पळापळीचा किंवा पकडापकडीचा खेळ नव्हे या खेळामध्ये आपण जंगलाप्रमाणे अनुभवतो ज्यामध्ये माणसांच्या अवतीभोवती फिरणारे भक्ष आणि त्याचा पाठलाग करणारा शिकारी असा दिसून येतो आणि याचा अनुभवी आपल्याला हा खेळ खेळताना होतो.

या खेळाचे बरेच फायदे आहेत जसे की यामध्ये लागणारी चपळता, पाठलाग करणाऱ्यापासून कसे सुटावे हे पाळणाऱ्या व्यक्ती विचार करत असतो त्याचप्रमाणे पाठलाग करणाऱ्या व्यक्ती हा वेगाने त्याबरोबर पळत असतो यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा खेळ किती दुर्मिळ आणि शारीरिक व्यायामासाठी किती आवश्यक आहे.

या खेळामध्ये तुमची बुद्धी तल्लख होते तुम्ही क्विक रिस्पॉन्स करू शकतात आणि चातुर्याने कसे वाचावे हे या खेळापासून आपल्याला शिकायला मिळते.

खो-खो खेळातील प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा | Kho Kho National Tournament

खो खो हा खेळ नॅशनल लेवललाही खेळला जातो आणि त्या लेव्हलपर्यंत पोहोचायला आपल्याला पहिल्यांदा जिल्हा पातळीवर हा खेळ जिंकावा लागतो, जिल्हा पातळीवर जिंकणारा संघ हा विभाग म्हणजेच झोनल पातळीवर जातो, आणि झोनल पातळीपासून जिंकणारा संघ हा स्टेट लेवल पर्यंत पोहोचतो स्टेट लेवल मध्ये खेळाडू हे नंतर नॅशनल लेवल पर्यंत हि खेळतात. (क्लिक करा)

मैदानी खेळ तर मॅट चा प्रवास | Outdoor games and Mat’s journey

मला माहित नाही की हा खेळ मॅटवर कधीपासून खेळला जाऊ लागला आहे पण, मी खो खो खेळाडू आहे म्हणून मला माहिती आहे की हा खेळ पहिले मातीच्या मैदानात खेळला जायचा ज्यामध्ये आठ खेळाडू सेंटर लाईनला बसलेले असायचे आणि एक खेळाडू प्रतिस्पर्धी असलेल्या तीन खेळाडूंचा पाठलाग करत असायचा. मैदानी खेळ असल्यामुळे या खेळांमध्ये खेळाडूला समोरच्या संघाच्या खेळाडूंना पकडण्यात दुखापत आणि इजा होत होत्या. तर कालांतराने हा खेळ कबड्डी प्रमाणेच मॅट वर खेळला जात आहे ज्यामध्ये खेळाडूंना इजा होत नाही.

आणि मला अतिशय आनंद वाटतो की हा खेळ कबड्डी प्रमाणेच तेवढाच लोकप्रिय झाला आहे आणि खूप म्हणजे काय हे लोकांना आता कळू लागले आहे.

तुम्ही जर एक खो खो खेळाडू असाल तर तुम्हाला माहितीच असणार की खेलो इंडिया युथ गेम्स यामध्ये हा खेळ समाविष्ट आहे ज्यामध्ये भारत सरकार आपल्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देत आहे आणि यामुळेच बऱ्याच खेळाडूंना आपले मानधनही मिळत आहे.

FAQ

What is Kho-Kho and its rules?

पाठलाग करत असलेल्या खेळाडू ने दुसऱ्या खेळाडूला “खो ” हा शब्द स्पष्टपणे उच्चारणे बंधनकारक आहे. तसेच पाठलाग करणाऱ्या खेळाडूची हालचाल प्रतिबंधित आहे पाठलाग करणारा खेळाडू हा फक्त त्या दिशेने धावू शकतो ज्या दिशेने तो पहिलं पाऊल टाकतो त्याला दिशानिर्देश देखील म्हणतात.

How many players are in Kho-Kho?

खो खो या खेळामध्ये दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी नऊ खेळाडू असतात आणि तीन राखीव खेळाडू असतात. दोन्ही संघाचे नऊ खेळाडू हे मैदानात खेळत असतात त्यापैकी एक संघ जो आपले नऊ खेळाडू मैदानात, समोरच्या संघाच्या तीन खेळाडूंचा पाठला करत असतो पाठपुरावा करत असतो. जे तीन खेळत असतात आणि त्यांचा जो संघ पाठलाग करत असतो त्यांना पकडत असतो.

Who is the father of Kho-Kho?

आधुनिक काळातील खो खोचे पहिले नियम आणि नियम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिले होते

Read more

1.कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती Kabaddi Information in Marathi

2.Indian Cricketer Yashasvi Jaiswal : biography, family, net worth, records in hindi

3.क्रिकेट खेळाची माहिती 2024 Cricket About Information In Marathi 2024

Leave a Comment